Indian Idol Singer Reveals Baby Boy Name : ‘इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमुळे अनेक गायक मंडळी प्रसिद्धीझोतात आली. या शोमुळे त्यांना आपली कला सादर करण्याचं नवं माध्यम मिळालं आणि ते आपली कला प्रेक्षकांसमोर आणू शकले. यापैकीच एक लोकप्रिय गायिका म्हणजे सायली कांबळे.
’इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने सायलीने देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. एकाहून एक गाणी सादर करत तिने आपल्या रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.
आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारी सायली सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे गाण्याचे व्हिडीओ शेय करत असते. तसंच स्वत:चे खास फोटोसुद्धा शेअर करताना दिसते. अशातच तिने काही दिवसांपूर्वी तिला बाळ झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
तीन महिन्यांपूर्वी सायली आई झाली. तिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. सोशल मीडियाद्वारे तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अशातच आता सायलीने बाळाचे बारसेसुद्धा केले आहे.
गोंडस बाळाबरोबरचे गोड फोटो शेअर करीत तिने बाळाचं नाव काय ठेवलं आहे, हे सांगितलं आहे. तसेच तिने बाळासाठी एक खास पोस्टसुद्धा शेअर केली आहे. तर सायलीने बाळाचे नाव नक्की काय ठेवले आहे? चला जाणून घेऊ…
सायली कांबळेने बाळाचे नाव ठेवलंय…
सायलीने तिच्या मुलाचं नाव जाहीर करत तिने एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “तीन महिन्यांपूर्वी एका इवल्याशा पावलांनी आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. हे नाव ज्ञानापासून प्रेरित नाव आहे. या नावाने आता एका सुंदर प्रवासाची सुरुवात होत आहे. हे नाव जगाला सांगण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. ते नाव आहे वेद धवल सायली पाटील.”
सायली कांबळेने शेअर केलेली पोस्ट
सायलीने शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये तिच्यावर मित्र-मैत्रिणी, चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सायली व तिचा पती धवल पाटील यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं.
सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवल पाटीलबरोबर लग्न केले. महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते.
