Divyanka Tripathi and Vivek Dahiya Baby News: कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. कलाकारही त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांबद्दल वेळोवेळी चाहत्यांना विविध माध्यमांतून सांगत असतात.

लोकप्रिय अभिनेत्री होणार आई?

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने टेलिव्हिजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००६ ला प्रदर्शित झालेल्या बनूँ मैं तेरी दुल्हन या मालिकेतून अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने विविध मालिकांमध्ये काम केले. ये हैं मोहब्बतें या मालिकेतील तिच्या भूमिकेचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. तिची भूमिका प्रचंड गाजली.

सध्या अभिनेत्री युट्यूब, सोशल मिडिया या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचा पती अभिनेता विवेक दहियादेखील या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. या जोडप्याचा मोठा चाहतावर्ग आहे. युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून हे कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, आठवणी, गमती जमती शेअर करतात. आता हे जोडपे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

Award Banner

टाइम्स ऑफ इंडियानुसार, दिव्यांका व विवेक लवकरच आई-बाबा होणार आहेत. लवकरच डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये कुटुंबिय आणि इंडस्ट्रीमधील काही मित्र सहभागी होणार आहेत. या गुडन्यूजमुळे घरात तसेच जवळच्या मित्र मंडळींमध्ये मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

आता विवेक किंवा दिव्यांकाने याबद्दल अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नाही. चाहते मात्र हे जोडपे यावर कधी बोलणार, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या कलाकारांची भेट ‘ये है मोहब्बतें’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्यांका व विवेक यांनी ८ जुलै २०१६ ला लग्नगाठ बांधली होती. भोपाळमध्ये मोठ्या थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या दहा वर्षानंतर ते आई-वडील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

याआधीदेखील दिव्यांका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या जोडप्याने या अफवा असल्याचे म्हटले होते. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे तर गेल्या काही काळापासून ती मालिका किंवा रिअॅलिटी शोपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी खतरों के खिलाडीच्या ११ व्या पर्वात दिसली होती.