वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करणं हे सेलिब्रिटी मंडळींसाठी काही नवं नाही. लग्नाला वयाचं बंधन नसतं असं कित्येक कलाकारांचं मत आहे. अगदी प्रियांका चोप्रानेही स्वतःच्या वयापेक्षा लहान निक जोनासबरोबर लग्न केलं. शिवाय नुकतंच आशिष विद्यार्थी यांनी ५७व्या वर्षी स्वतःपेक्षा लहान असलेल्या रुपालीशी विवाह केला. आता अशाच एक लग्नाची नव्याने चर्चा रंगत आहे. ‘इश्क का रंग सफेद’ मालिकेतील अभिनेत्री स्नेहल रायने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.
स्नेहलने लग्नाच्या दहा वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे. ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिची लव्हस्टोरी, लग्न, नवरा याबाबत अनेक खुलासे केले. वयाच्या २३व्या वर्षीच स्नेहलने लग्न केलं. स्नेहल म्हणाली, “मी कधीच माझं लग्न लपवून ठेवलं नाही. फक्त माझ्या खासगी आयुष्याबाबत मी बोलणं टाळलं. लग्न केल्यामुळे माझ्या करिअरवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही”.




आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली…
लग्नानंतरच स्नेहलच्या करिअरला सुरुवात झाली. ती म्हणते, “लग्नानंतर रात्री मी घरी उशीरा आली किंवा उशीरा कोणाचाही फोन आला की, माझ्या पतीला काळजी वाटायची. पण कलाक्षेत्रामध्ये कशाप्रकारे काम चालतं हे त्यांना आता माहित आहे. आता त्यांना कोणत्याच प्रकारची चिंता वाटत नाही”.
स्नेहलने राजकीय नेते माधवेंद्र राय यांच्याशी लग्न केलं. माधवेंद्र यांच्यापेक्षा २१ वर्षांनी ती लहान आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी सुत्रसंचालिका म्हणून ती काम करायची. दिल्ली येथे एका कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत असताना या दोघांची भेट झाली. या कार्यक्रमामध्ये माधवेंद्र यांचं नाव स्नेहलने अडखळत घेतलं. कार्यक्रम संपल्यानंतरही हे दोघं एकाच फ्लाइटमध्ये होते. यानंतरच या दोघांमध्ये मैत्री झाली. आता गेली दहा वर्ष स्नेहल व माधवेंद्र सुखाचा संसार करत आहेत.