मनोरंजसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता हिंदी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी चंदना. सुरभीने नुकतीच तिचा प्रियकर करण शर्माबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जयपूरमध्ये सुरभी व करणचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मेहंदीपासून सप्तपदीपर्यंतचे सुरभी व करणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नात सुरभीने पेस्टल रंगाचा कॉन्ट्रास लेहंगा परिधान केला होता व डोक्यावर पिच कलरची ओढणी घेतली होती; तर करणने ग्रे रंगाची शेरवानी आणि गोल्डन रंगाची पगडी घातली होती. या लूकमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत होते. तर मेहंदीसाठी सुरभीने निळ्या व हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरभीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच सुरभीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाची घोषणा केली होती. सुरभीने करणबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहले होते, “मी १३ वर्षांपासून त्याच्या आयुष्यात रंग भरत आहे, आता आम्ही कायमस्वरुपी एकत्र राहण्यासाठी नवी सुरुवात करतोय.” सोशल मीडियावर सुरभीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचे अभिनंदन केले होते.

हेही वाचा- वाइल्ड कार्ड स्पर्धक मनीषा रानी ठरली ‘झलक दिखला जा ११’ ची विजेती, आंतरराष्ट्रीय ट्रिपसह मिळाली ‘इतकी’ रक्कम

सुरभीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘इश्कबाज’ मालिकेमधून सुरभी घराघरांत पोहचली. त्यानंतर ‘नागिन’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. आता नुकतेच तिने ओटीटीवर पदार्पण केले आहे. ‘रक्षक इंडियाज ब्रेव्स चॅप्टर २’ या सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे, तर करण शर्मा हा बिझनेसमॅन आहे. तसेच तो ‘हेवन्स’ नावाची एनजीओही चालवतो.