Jahnavi Killekar Dance Video : छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका म्हणून अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ही अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात देखील सहभागी झाली होती. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. जान्हवीला महाराष्ट्राच्या घराघरांत आता ‘किल्लर गर्ल’ म्हणूनही ओळखलं जातं. तिने नुकताच संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘लाल लाल कलरची बांगडी’ या संजू राठोडच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. संजूची आजवरची सगळीच गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरली आहेत. सध्या नेटकऱ्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला सुद्धा या ‘लाल बांगडी’ गाण्याची भुरळ पडली आहे.
जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने संजू राठोडच्या व्हायरल ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने यामध्ये मूळ गाण्याप्रमाणे कमाल एक्स्प्रेशन्स देत हुबेहूब डान्स स्टेप्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.
जान्हवीचे जबरदस्त एक्स्प्रेशन्स आणि डान्स पाहून या व्हिडीओवर संजू राठोडने “छान…” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“ट्रेंड पूर्ण झाला”, “आता कुठे ट्रेंड शोभला..मस्त डान्स”, “सो Pretty असेच नवनवीन व्हिडीओ बनवत जा”, “किती सुंदर मस्त भारी”, “मॅडम एकदम भारी परफॉर्मन्स”, “मॅडम किती भारी”, “जान्हवी ताई तुम्ही असे व्हिडीओ बनवत जा” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, “लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल” असे या गाण्याचे बोल आहेत. संजू राठोडने स्वत: हे गाणं लिहिलं असून त्यानेच कंपोझ सुद्धा केलं आहे. यासह या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना संजू राठोड आणि ईशा मालवीय यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली आहे.
