Jahnavi Killekar emotional video: कलाकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते स्वत: शेअर करतात, कधी त्यांचे जुने व्हिडीओ शेअर केले जातात. काही वेळा त्यांच्या मुलाखतीतील वक्तव्यांची चर्चा होते, तर अनेकदा कलाकारांच्या जवळच्या व्यक्ती त्यांचे व्हिडीओ शेअर करतात; त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

जान्हवी किल्लेकरचा हा व्हिडीओ तिची जाऊ कोमल किल्लेकरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कोमलच्या पायाची मालिश करत असल्याचे दिसत आहे. जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. या व्हिडीओवर काळजी, मैत्री, आदर आणि नि:स्वार्थ प्रेम या सगळ्याचं सुंदर रुप म्हणजे जाऊ बाई, असे लिहिले आहे.

जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईने शेअर केला व्हिडीओ

तसेच कोमल किल्लेकर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, “माझ्या सर्जरीनंतर मी जान्हवीच्या घरी राहत होते. तिने मला कशाचीच कमी पडू दिली नाही. तिने आणि माझ्या सासूबाईंनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी खूप प्रेमाने, संयमाने माझी काळजी घेतली. मला अशा पद्धतीने काळजी करणाऱ्या जाऊबाई आणि आई मिळाल्या, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “जान्हवी मॅडम तुमचा अभिमान आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप छान, मैत्री असावी तर अशी असावी”, आणखी एकाने लिहिले, “कोमल नशीबवान आहेस, तुला अशी प्रेमळ आणि गोड जान्हवीसारखी जाऊ मिळाली”, एकाने लिहिले, ” करिअर, कुटुंब यामध्ये समतोल राखायला कसं जमतं जान्हवी तुला? खूप छान दिसतेस, खूप प्रेमळ आहेस”, आणखी एकाने लिहिले, “नजर नको लागायला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तसेच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिचे विविध लूक कायमच लक्ष वेधून घेत असतात. जान्हवी किल्लेकर अनेकदा तिला आलेले विविध अनुभवही सांगत असते. तसेच ती तिच्या भावनाही व्यक्त करते. जान्हवी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या डान्ससाठीदेखील ओळखली जाते.

दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.