scorecardresearch

Premium

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर लवकरच नव्या भूमिकेत; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार

अभिनेता अक्षय मुडावदकरनं ‘या’ नव्या भूमिकेबाबत स्वतः केला खुलासा

Jai Jai Swami Samartha fame actor Akshay Mudwadkar
अभिनेता अक्षय मुडावदकरनं 'या' नव्या भूमिकेबाबत स्वतः केला खुलासा (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘जय जय स्वामी समर्थ’ ही ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. अलीकडेच या मालिकेनं ९०० भागांचा टप्पा पार केला. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेला अजूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय मुडावदकरनं स्वामी समर्थांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षक अक्षयवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. आता लवकरच अक्षय नव्या भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा – Video: गणेशोत्सवानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची प्रेक्षकांसाठी खास भेट; आता…

gayatri joshi car accident video
Video : भरधाव वेगाने ओव्हरटेक, ट्रक पलटी अन् फेरारी कार…; ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कार अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर
samantha ruth prabhu on working with salman khan
आजारपणासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर समांथा प्रभू झळकणार सलमान खानबरोबर? अभिनेत्री म्हणाली, “माझ्या कम्फर्ट झोनमधून…”
sundara manamadhe bharli fame akshaya naik
“कानटोपी, मोठा चष्मा अन्…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री लवकरच दिसणार नव्या भूमिकेत, समोर आली पहिली झलक
tharala tar mag bts video
‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार प्रतिमाची एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”

दरम्यान, अभिनेता अक्षय मुडावदकर हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. नेहमी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकासंबंधित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. त्याने काल सोशल मीडियावर “काहीतरी नवीन” असं लिहीतं पोस्ट शेअर केली होती. आता हे काहीतरी नवीन काय आहे याचा उलगडा झाला आहे.

हेही वाचा – ‘जवान’ फेम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर करणार लग्न? चर्चांना उधाण

अक्षय आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिलीप प्रभावळकर लिखित ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या नाटकात अक्षय पाहायला मिळणार आहे. लवकरच हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ नाटकात अक्षयबरोबर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील ‘लतिका’ अर्थात अक्षया नाईक झळकणार आहे. दोघं वृद्ध जोडप्याची भूमिका साकारणार आहेत. अक्षय व अक्षया व्यतिरिक्त या नाटकात महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल असणार आहेत.

हेही वाचा – सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकर सात महिने घरी का बसला होता? नेमकं काय घडलं होतं? वाचा

महेश डोकंफोडे हे ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या नाटकांचे दिग्दर्शक देखील आहे. तसेच अशोक पत्की याचं या दोन अंकी नाटकाला संगीत असणार आहे. आता हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार हे येत्या काळात समजेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jai jai swami samartha fame actor akshay mudwadkar play new role in chukbhul dyavi ghyavi marathi drama pps

First published on: 17-09-2023 at 12:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×