Jay Dudhane New Car Photo : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या घेतल्याचं पाहायला मिळालं. हक्काचं घर घेतलं की, एक छानशी गाडी असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अपूर्वा नेमळेकर, रिंकु राजगुरू, उपेंद्र लिमये या लोकप्रिय कलाकारांपाठोपाठ मराठी मनोरंजनसृष्टीतील एका अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे. Splitsvilla, 'बिग बॉस मराठी' ३ अशा विविध शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून जय दुधाणेला ओळखलं जातं. Splitsvilla च्या १३ व्या पर्वाचा जय विजेता ठरला होता. त्याने हा शो अदिती राजपूतबरोबर जिंकला होता. यानंतर अभिनेत्याने 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात प्रवेश घेतला. या पर्वाचा जय उपविजेता ठरला. याशिवाय स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होतं. हेही वाचा : Bigg Boss Marathi - Video : ‘झापुक झुपूक’ म्हणत सूरज चव्हाण झाला घराचा नवीन कॅप्टन! निक्कीने मारली मिठी, रुमच्या पाया पडला अन्…; पाहा प्रोमो जय दुधाणेने घेतली नवीकोरी गाडी जयच्या घरी नुकतंच एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने महागडी गाडी खरेदी केली आहे. नवीन गाडी घेतल्याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी जयचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. जून महिन्यात जयच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे ही नवीन गाडी खरेदी करताना वडिलांची आठवण म्हणून अभिनेत्याने त्याच्या बाबांचा फोटो देखील जवळ ठेवला होता. हेही वाचा : नवरी मिळे हिटलरला : जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार, एजेने बनवली बाप्पाची सुबक मूर्ती Jay Dudhane New Car : जयने घेतली नवीन गाडी जय सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. जय 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वाचा उपविजेता असल्याने अनेकदा सध्या सुरू असलेल्या पाचव्या सीझनबाबत देखील तो आपलं मत मांडत असतो. Jay Dudhane New Car : जयने घेतली नवीन गाडी हेही वाचा : Video : “अप्सरा आली…”, मराठी गाण्यावर थिरकली दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी; बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स जयच्या आईने केली गाडीची पूजा Jay Dudhane New Car : जयने घेतली नवीन गाडी नवीन गाडी घेताना जय, त्याची आई व बहीण असे सगळेजण उपस्थित होते. गाडी खरेदी केल्यावर आपल्या आईने पूजा केल्याचा व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नव्या गाडीसाठी जयवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.