छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या काही महिन्यांत अनेक रील लाइफ जोड्या खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याचं आपण पाहिलं. तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे यांच्या पाठोपाठ ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्नगाठ बांधली आहे. इन्स्टाग्रामवर अचानक लग्नाचे फोटो शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना सुखद दिला होता. पडद्यावरची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सध्या त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

सौरभ – योगिता या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकल्यावर या जोडप्याने मार्च महिन्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या लाडक्या बायकोसाठी मालवणीत उखाणा घेतला आहे.

nana patole yogi adityanath
नाना पटोलेंकडून योगी आदित्यनाथांची रावणाशी तुलना; म्हणाले, “सीतेला पळवून नेण्यासाठी…”
Make this easy and tasty Mango-Rawa Cake recipe
मँगो-रवा केकची सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा; नोट करा साहित्य अन् कृती
Ruskin Bond
“परदेशी लोकांसारखा दिसतो म्हणून माझ्याकडून…”, प्रसिद्ध भारतीय लेखकाने व्यक्त केली खंत
uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
A Gentleman suggested men to say i love you to their wife and express love
VIDEO : “बायकोला I Love You म्हणा..” प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण कंजूसपणा का करतो? काकांनी दिला पुरुषांना सल्ला
pravin tarde post for Murlidhar Mohol
प्रवीण तरडेंची पुण्याचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फक्त दोन शब्दांची पोस्ट, म्हणाले…
sushma andhare on raj thackeray (1)
“माझ्या नावाची सुपारी मिळणे…”, सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाल्या, “रमेश किनी हत्याकांड, कोहीनूर मिल आणि…”
Nana patole on uddhav thackeray
“…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”

हेही वाचा : राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “पैसे घेऊन विशिष्ट…”

सौरभ राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मालवणी भाषेत उखाणा घेत म्हणाला, “शेजाऱ्यांच्या कलमाक धरलो आंबो जून, चव्हाणांच्या चेडवाक केलंय चौघुलेंची सून” तसेच नवऱ्याचा भन्नाट उखाणा ऐकल्यावर योगिता म्हणते, “जागोजागी होई मला याचेच भास, सौरभचं नाव घेऊन भरवते चीज केकचा घास” दोघांनी घेतलेल्या या हटके उखाण्यांची सध्या चर्चा रंगलेली आहे.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी

दरम्यान, योगिता आणि सौरभची पहिली भेट ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन ऑनस्क्रीन अंतरा-मल्हारच्या जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ३ मार्चला योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या विवाहसोहळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.