‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराची ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा ३ मार्चला थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सध्या योगिता-सौरभच्या लग्नातील अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे योगिता-सौरभ हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले. त्यामुळे या जोडप्याने लग्नातील खास क्षण ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचं शीर्षक गीत लावून शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील सातफेरे, वरात, वरमाला व लग्नविधींची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय विवाहसोहळा पार पडल्यावर या दोघांनी एकमेकांसाठी खास उखाणे घेतले होते.

हेही वाचा : ‘बाळूमामा…’, मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर सुमीत पुसावळेची स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत एन्ट्री! प्रोमो पाहिलात का?

योगिता उखाणा घेत म्हणाली, “जागोजागी होईल मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास”, तर बायकोसाठी खास उखाणा घेत सौरभ म्हणतो, “एक होती चिऊ, एक होता काऊ…योगिताला घास भरवायला मी वाट कोणाची पाहू”

हेही वाचा : Video : लेक सुहाना अन् बिग बींच्या नातीसह शाहरुख खानचा डान्स, दिलजीत दोसांझच्या गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, योगिता-सौरभने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला. मालिका संपल्यानंतर ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने प्रेक्षकांना आनंद व्यक्त केला आहे. या दोघांच्या लग्नाला अक्षया नाईक, अक्षय केळकर, ज्योती दाते, सुमेधा दातार, पूर्वा शिंदे या कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती.