‘जीव माझा गुंतला’ ही मालिका २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास २ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर २०२३ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिकेत योगिताने ‘अंतरा’ तर, सौरभने ‘मल्हार’ हे पात्र साकारलं होतं. मालिका संपल्यावर या रील लाइफ जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र यायचा निर्णय घेतला.

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी ३ मार्च रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील सगळ्याच कलाकारांनी योगिता आणि सौरभवर कौतुकाचा वर्षाव केला होता. नुकतीच अभिनेत्रीने मोठ्या उत्साहात तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली होती. यानंतर आता योगिताची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

हेही वाचा : ५८ वर्षांचा सलमान खान अजूनही अविवाहित का? त्याचे वडील सलीम खान म्हणाले, “तो सहज आकर्षित होतो, पण…”

योगिताने ‘पुष्पा २’ चित्रपटातील ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. हे गाणं श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. या ‘सूसेकी’ गाण्यावर योगिताने अगदी सुंदर डान्स केला आहे.

योगिताचा पती सौरभ सुद्धा आपल्या बायकोचा हा डान्स पाहून भारावला आहे. या गाण्याचे बोल “अंगारो का अंबर सा लगता हैं मेरा सामी” असे आहेत. त्यामुळे अर्थात अभिनेत्रीने हा डान्स तिच्या नवऱ्यासाठी केला आहे. आपल्या बायकोचं कौतुक करत सौरभने कमेंट्समध्ये “थँक्स श्रीवल्ली” असं म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी देखील योगिताच्या डान्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : २५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट सुरुवातीला १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हा बहुचर्चित चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे आता ‘पुष्पा २’ कडून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.