jeev maza guntala fame actress purva shinde buys new car shared video | Loksatta

Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी; व्हिडीओ व्हायरल

Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीने नवी कोरी कार खरेदी केली आहे. (फोटो: पूर्वा शिंदे/ इन्स्टाग्राम)

अभिनेत्री पूर्वा शिंदे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांन माहिती दिली आहे.

पूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. Kia कंपनीची कार पूर्वाने खरेदी केली आहे. गाडी खरेदी करतानाचा कुटुंबियांसोबतचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. “ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझी कार माझा अभिमान आहे. हे स्वप्न मी नेहमी बघत आले आहे. माझं स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे. माझ्या कुटुंबियांसाठी मी गाडी खरेदी केली आहे”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा>> “हिंदीत कितीही मोठं काम केलं तरी…” स्वप्निल जोशीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

हेही वाचा>> सुश्मिता सेन व ललित मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टाकलं मागे; सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप १० व्यक्तींची यादी समोर

पूर्वाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. तसेच तिच्या कामाबद्दलची माहितीही ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते.

हेही वाचा>> हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…

‘लागिर झालं जी’ या मालिकेतून पूर्वा घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने जयडी हे पात्र साकारलं होतं. सध्या पूर्वा कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:18 IST
Next Story
“हिंदीत कितीही मोठं काम केलं तरी…” स्वप्निल जोशीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत