Jennifer Winget and William Ishmael wedding in Goa: जेनिफर विंगेट गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जुलैमध्ये तिने सिंगापूरमधील बिझनेसमन विल्यम इश्माएलशी लग्नगाठ बांधली होती. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत तिने लग्न केले होते. युकेमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. जेनिफरच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

जेनिफर विंगेटने विल्यम इश्माएलबरोबर गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

आता जेनिफरने विल्यम इश्माएलशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. गोव्यात जेनिफर आणि विल्यम इश्माएल यांनी दुसऱ्यांदा लग्न केले. यावेळी तिने सुंदर गाऊन घातला होता. तसेच, कमी दागिने घातले होते. तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे. तर इश्माएलने पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर ऑलिव ग्रीन रंगाचे ब्लेझर तसेच, लाइट बेज ट्राउजर परिधान केले होते. त्यांच्या लग्नातील व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जेनिफर विंगेट आणि विल्यएम इश्माएल (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

व्हिडीओमध्ये जेनिफर व विल्यम इश्माएल यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. तसेच, समोर आलेल्या फोटोंमध्ये डब्यू (W) आणि जे (J) ही आद्याक्षरे पाहायला मिळत आहे. तसेच, लग्नाच्याआधीच्या कार्यक्रमांमध्ये इंडस्ट्रीतील तिचे अनेक मित्र-मैत्रीणी सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जेनिफर विंगेट आणि विल्यएम इश्माएल (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

करण वाही, मंदिरा बेदी, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख असे अनेक कलाकार जेनिफरच्या लग्नातील कार्यक्रमात हजर होते. जिनिलीया व जेनिफरचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्यामध्ये जिनिलीया जेनिफरला मिठी मारते. रितेश व जिनिलीयाने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स करत जेनिफर व विल्यम इश्माएल यांचे कौतुक केले आहे.

जेनिफर विंगेट आणि विल्यएम इश्माएल यांच्या लग्नात कलाकारांनी लावली हजेरी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

विल्यम इश्माएलबरोबरचे जेनिफरचे दुसरे लग्न आहे. याआधी तिने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोव्हरबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. २०१४मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

दरम्यान, जेनिफरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘शक: ट्रस्ट नो वन’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज २४ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.