Jennifer Winget Second Marriage: ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुसुम’, ‘सरस्वती चंद्र’, ‘बेहद’, ‘दिल मिल गया’, ‘ बेपनाह’ अशा अनेक मालिकांमधून अभिनेत्री जेनिफर विगेंटने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सरस्वती चंद्र या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. त्याबरोबरच बेहद, बेपनाह या मालिकांतील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. जेनिफर वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.
जेनिफर विंगेट करणार दुसरे लग्न?
अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जेनिफर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ती विल्यम इश्माएल (William Ishmael)ला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. विल्यम इश्माएल हा सिंगापूरमधील व्यावसायिक आहे. तो काही काळापासून नात्यात असल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधला. सूत्रांनुसार, “जेनिफर आणि विल्यम एकत्र खूप आनंदी आहेत. त्यांना आणि त्यांच्यातील प्रेमळ नात्याला पाहणं हा एक आनंदाचं आहे. विल्यमने जेनिफरला लग्नाची मागणी घातली आणि तिनं होकार दिला. आता ते त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. लग्न कुठे आणि कसे करायचे याबद्दल ते ठरवीत आहेत. हे लग्न ख्रिश्चन पद्धतीनं होईल. सध्या ते सप्टेंबर-ऑक्टोबरचा विचार करीत आहेत आणि डिसेंबर-जानेवारी हादेखील एक पर्याय आहे. हरलीन सेठी व जेनेलिया देशमुख यांसारख्या इंडस्ट्रीतील मित्रांसह तिच्या सर्व जवळच्या मित्रांना याबद्दल माहीत आहे.”
याबरोबरच या अभिनेत्रीने लग्नाशी संबंधित अनेक सोशल मीडिया पेजेसना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ती लग्न करणार असल्याच्या अंदाज चाहत्यांनी लावला होता.
काही दिवसांपूर्वी जेनिफर आणि करण वाही एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चाही चाहत्यांमध्ये सुरू होत्या; पण करण वाहीने त्या अफवा फेटाळून लावल्या. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असे त्याने म्हटले होते.
दरम्यान, जेनिफरचे हे दुसरे लग्न असणार आहे. याआधी तिने अभिनेता करणसिंह ग्रोव्हरबरोबर लग्नगाठ बांधली होती. ‘दिल मिल गए’च्या सेटवर त्यांच्यात जवळीक वाढली होती. जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हरने २०१२ मध्ये लग्न केले होते. पण, हे लग्न फक्त दोन वर्षे टिकले आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
