सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या यादीमध्ये जेनिफर विंगेटचा (Jennifer Winget) नंबर टॉपला आहे. जेनिफरला हिंदी मालिकांमुळे एक वेगळी ओळख मिळाली. ती छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचली. आपल्या कामाबरोबरच जेनिफर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. अभिनेत्री बिपाशा बासूचा पती आणि अभिनेता करण सिंह ग्रोवरबरोबर (Karan Singh Grover) जेनिफरचा घटस्फोट झाला. करण-जेनिफरच्या घटस्फोटाची बातमी ऐकताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेनिफर आणि करणचा घटस्फोट का झाला? असा प्रश्न आजही विचारला जातो. घटस्फोटाच्या अनेक वर्षांनतर जेनिफरने घटस्फोटामागचे कारण सांगितले आहे.

हेही वाचा- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवरील कारवाईवर सुयश टिळकने केलं भाष्य, निषेध व्यक्त करत म्हणाला…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

जेनिफर विंगेट आणि करण सिंग टीव्ही शो ‘दिल मिल गए’च्या सेटवर जवळ आले होते. या मालिकेतील जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हरची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हरने २०१२ मध्ये लग्न केले होते. पण हे लग्न फक्त दोन वर्षे टिकले आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करणचे जेनिफरसोबतचे हे दुसरे लग्न होते. करण सिंग ग्रोव्हरपासून घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफर विंगेट दु:खी झाली होती. यातून सावरायला त्याला बराच वेळ लागला. मग तिने कसतरी स्वतःला सावरल आणि पुन्हा कामाला लागली.

हेही वाचा- “मी त्याच्यावर वेडयासारखं करते, पण…”; जेव्हा रेखाने अमिताभ बच्चन यांच नाव न घेता दिली होती प्रेमाची कबुली

जेनिफर विंगेटने एकदा ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत करण सिंग ग्रोव्हरपासून घटस्फोटाबद्दल बोलले होते. जेनिफर म्हणाली होती की, काही वर्षे करणला डेट केल्यानंतर तिने करणशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. जेनिफरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने तिच्या मैत्रिणींना सांगितले की ती करणची दुसरी पत्नी बनणार आहे, तेव्हा सर्वांनी तिला ‘वेडी’ म्हणत आणि असे न करण्याचा सल्ला दिला होता.

एवढंच नाही तर जेनिफरच्या पालकांनी तिला करणरशी लग्न करण्याबाबत चेतावणीही दिली होती. जेनिफर घाईघाईने लग्नाचा निर्णय घेत आहे, जे चुकीचे आहे. तिने एकदा विचार करावा, असा सल्ला तिच्या पालकांनी तिला दिला होता. पण जेनिफर करणच्या प्रेमात पडली होती आणि ती त्याच्याबरोबर लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती तिच्यावर ठाम होती. त्यावेळेस जेनिफर म्हणाली होती. जर खाली येऊन देवाने जरी सांगितले असते करणशी लग्न करु नकोस तरी मी ऐकले नसते.

हेही वाचा- “आपण पुन्हा भेटेपर्यंत…”; वैभवी उपाध्यायच्या आठवणीत प्रियकर जय गांधी भावुक; पोस्ट करत म्हणाला…

मात्र, घटस्फोटाच्या तब्बल ९ वर्षानंतर जेनिफरने घटस्फोटामागील कारणाच खुलासा केला आहे. जेनिफर म्हणाली की, “यात ना माझी चूक होती ना करण सिंग ग्रोव्हरची. जे व्हायचं होतं ते झालं. जेनिफर आणि करण घटस्फोटासाठी तयार नव्हते. तिची आणि करणची खूप दिवसांपासून मैत्री होती आणि जेव्हाही ते एकत्र असायचे तेव्हा खूप गोंधळ घालायचे. पण दुर्दैवाने हे सर्व संपुष्टात आले.”

रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसूमुळे करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटचे लग्न मोडले असल्याचे म्हटले जात आहे. खरंतर करण त्यावेळी बिपाशाबरोबर ‘अलोन’ चित्रपटात काम करत होता. त्याचवेळी दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. करणने नंतर जेनिफरला घटस्फोट दिला आणि बिपाशा बसूशी लग्न केले. बिपाशा आणि करण आता एका मुलीचे पालक झाले आहेत.

Story img Loader