‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ आणि ‘उदे गं अंबे’ या दोन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेची अद्याप तारीख आणि वेळ जाहीर झालेली नाही. पण अभिनेता देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘उदे गं अंबे ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० ही मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता या नव्या मालिकांमुळे कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची चर्चा सुरू आहे.

‘स्टार प्रवाह’ची सुपरहिट मालिका ‘ठरलं तर मग’ बंद होणार असल्याचं किंवा वेळ बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीने यावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून यासंबंधित चाहत्यांशी संवाद साधला.

tharala tar mag arjun saw the birthmark of sayali
ठरलं तर मग : सायलीच खरी तन्वी! अर्जुनने पाहिली बायकोच्या पायावरची जन्मखूण; प्रियाचा खोटेपणा उघड होणार, पाहा प्रोमो
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
tharala tar mag pratima regain her voice
ठरलं तर मग : प्रतिमाची वाचा परत आली! लेकीसाठी पूर्णा आजीला अश्रू अनावर, तर प्रिया घाबरून…; पाहा मालिकेचा भावुक प्रोमो
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
tharala tar mag raviraj killedar slaps priya aka fake tanvi
ठरलं तर मग : रविराज उचलणार मोठं पाऊल! प्रियाला सर्वांसमोर थेट कानाखाली मारणार; ‘त्या’ कृतीवर संताप, पाहा प्रोमो
tharala tar mag purna aaji aka jyoti chandekar bought new car
‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली स्वत:ची गाडी! लेक तेजस्विनी आईबद्दल म्हणाली…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…

हेही वाचा – Video: “तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला, “अंगाला तेल लावून…”

एका चाहत्याने विचारलं की, ताई खूप लोक ‘ठरलं तर मग’ संपणार आहे, असं बोलतायत. हे खरं नाहीये ना? यावर जुई उत्तर देत म्हणाली, “हे अजिबात खरं नाहीये. मला माहित नाही कोण असं सांगतंय की, ‘ठरलं तर मग’ संपणार आहे. खरंतर अजून मालिका सुरुच झाली नाहीये, असं मी म्हणणे. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टींचा अजून खुलासा झालेला नाहीये आणि त्याचा येत्या काही भागात खुलासा होणार आहे. तुम्ही जे जे प्रश्न विचारतायत ते येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज एकही भाग बघायला विसरू नका.”

तसंच दुसऱ्या चाहत्याने विचारलं, “ताई बरेच जण म्हणताय आहेत की, ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार आहे, हे खरं आहे?” याच उत्तर देत जुई म्हणाली की, जोपर्यंत ‘स्टार प्रवाह’ तुम्हाला काही सांगत नाही, तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला माझी विनंती आहे.

Jui Gadkari Insta Story

हेही वाचा – Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘हे’ गाणं लावून सर्व सदस्यांना केलं जागं, म्हणाला…

पुढे आणखी एक चाहता म्हणाला की, या आठवड्याचा टीआरपी ७.० होता. ‘ठरलं तर मग’ मालिकेचं किती मोठं यश आहे. यावर जुई म्हणाली, “होय. यासाठी मालिकेचं संपूर्ण युनिट परिश्रम करतं आणि देव त्यांच्या प्रेमावर वर्षाव करतं.”