scorecardresearch

“‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचा कार्यक्रम आहे जिथे बॉलिवूड स्टार्स आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात.

krk

चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आली की बॉलिवूड स्टार्स सर्वतोपरी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध शहरांमध्ये जाऊन अनेक कार्यक्रमांना उपास्थित राहतात. त्याचप्रमाणे अनेक मालिका, रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावत ते आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतात. ‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचा कार्यक्रम आहे जिथे बॉलिवूड स्टार्स आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. मात्र आता एका प्रसिद्ध निर्मात्याने याच कार्यक्रमाला पनवती म्हटलं आहे.

जवळपास सर्व बॉलिवूड चित्रपट या कार्यक्रमांमध्ये आपल्या चित्रपटाचा प्रमोशन करण्यासाठी सहभागी होतात. पण शाहरुख खानने मात्र या कार्यक्रमात ‘पठाण’चं प्रमोशन करण्यास नकार दिला. तरीही या चित्रपटाने जगभरातून ८०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध निर्मात्याने ट्वीट करत ‘द कपिल शर्मा शो’वर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदा नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारा के आर के म्हणजेच कमाल आर खान याने ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘पठाण’चा उल्लेख करत एक ट्वीट केलं. त्याने लिहिलं, “शाहरुख खानने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘पठाण’चं प्रमोशन केलं नाही पण हा चित्रपट सुपरहिट झाला. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं प्रमोशन देखील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झालेलं नाही हा चित्रपटही सुपरहिट ठरला. यावरूनच ‘द कपिल शर्मा शो’ चित्रपटांसाठी पनवती आहे. बाकीचे स्टार्स त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.”

हेही वाचा : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, चाहत्यांना सक्सेस मंत्र देत म्हणाला…

केआरकेचं ट्वीट सध्या चांगलाच व्हायरल होतं. ह्या ट्विटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी आता या ट्वीटमुळे केआरकेवर निशाणा साधला आहे. आता या ट्वीटमुळे पुन्हा एकदा केआरके चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:37 IST