Tunisha Sharma Committed Suicide: अभिनेत्री तुनिषा शर्माने काल दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. ती सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती. तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धाका बसला आहे. तुनिषाच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीतील कलाकार दुःख व्यक्त करत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिची आत्महत्या आहे की हत्या असा संशय व्यक्त केला आहे.

तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टी सामोर येत आहेत. तुनिषा शर्माच्या आत्महत्येबाबत पोलीस तपास करत आहेत. त्यांनी तिचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान यालाही ताब्यात घेतलं आहे. सहकलाकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समजत आहे. तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवलं अशीही माहिती समोर आली. तर ‘फ्री प्रेस जर्नल’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास

आता अभिनेता, समीक्षक कमाल आर खान याने ट्वीट करत तिच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं, “मला कळत नाही की, एक मुलगी सेटवरील छोट्याशा बाथरूममध्ये स्वतःला गळफास कसा लावून घेऊ शकते? याचा योग्य तपास व्हायला हवा.”

हेही वाचा : “आई-वडिलांचा विचार येत नाही का?”, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

तुनिषाने शर्माने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ या चित्रपटांमध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.