Kamali and Lakshmi Niwas upcoming twist: ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ दोन्ही मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहेत. सध्या या मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे.

कमळी मालिकेत कमळीचा खडतर प्रवास पाहायला मिळतो. ‘कमळी’ ही गावात तिच्या आईबरोबर राहणारी मुलगी होती. मात्र, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी ती मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

अनिकाला कमळीबद्दल अगदी भेटल्यापासून ईर्ष्या वाटत होती. त्या ईर्ष्येतून तिने कमळीला वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू नये म्हणून तिने अनेक प्रयत्न केले. जेव्हा कमळीला प्रवेश मिळाला, तेव्हा तिने तिची आजी कामिनीच्या मदतीने तिला त्रास दिला. अनेकदा तिला कॉलेजमधून बाहेर काढले जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली.

Award Banner

कमळीने मात्र कधीही हार मानली नाही. तिने प्रत्येक अडचणींतून मार्ग काढला. निंगी, बंड्या यांच्याबरोबरच अन्नपूर्णा आजी आणि ऋषीने तिला वेळोवेळी मदत केली.

सध्या मालिकेत राजन आणि अन्नपूर्णा त्यांच्या मोठ्या नातीचा शोध घेत असल्याचे दिसत आहे. राजन आणि गौरी यांचे लग्न झाले होते. त्यांना मुलगी झाली. त्यानंतर राजन परदेशात नोकरीसाठी गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा गौरी व तिचे कुटुंब त्याला सापडले नाही. खरेतर कामिनीने गौरी व तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गौरी तिच्या वडील आणि मुलीसह दुसऱ्या गावात राहण्यासाठी गेली. तिने तिची ओळख बदलली. स्वत:चे नाव सरोज असे ठेवले. तिच्या मुलीला राजनच्या कुटुंबापासून दूर ठेवले. गौरीला राजनच्या आयुष्यातून बाजूला करून कामिनीने स्वत:च्या मुलीचे राजनशी लग्न लावून दिले.

“बॅग उचल आणि…”

आता जेव्हा राजन त्याच्या मोठ्या मुलीचे स्केच बनवून घेतले. त्यावेळी कामिनीने पुन्हा कट कारस्थान केल्याचे महासंगमच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजी कामिनी आणि अनिकाला लक्ष्मीच्या मदतीने शिक्षा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अन्नपूर्णा आजी कामिनी आणि अनिकाला घराबाहेर काढते. ती म्हणते, “बॅग उचल आणि इथून चालती हो.” पुढे प्रोमोमध्ये दिसते कामिनी आणि अनिका लक्ष्मीच्या घरात कामे करत आहे. अनिका पीठीने स्वत: चेहरा खराब करून घेते. तर कामिनीला काम करताना त्रास होतो. दोघीही थकून एका ठिकाणी बसलेल्या दिसतात.

प्रोमोमध्ये असेही पाहायला मिळते की सरोज ही कामिनीसमोर येते आणि जान्हवी जयंतसमोर येते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अन्नपूर्णा शिकवणार कामिनी-अनिकाला जन्माचा धडा”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता मालिकेत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.