Kamali Dance Video : सध्या संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा मोठ्या जल्लोषात होळी सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी ‘झी मराठी’वरील कलाकारांनी सुद्धा एक दिवस आधीच एकत्र धुळवड साजरी केली आहे. याचदरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या कमळीने हृषी सरांबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. हा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्राम शेअर केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘कमळी’ अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये सुद्धा आघाडीवर आहे. नुकतंच या मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन होळी सेलिब्रेशन केलं. यावेळी ‘कमळी’ आणि हृषी सरांनी एकत्र जबरदस्त डान्स केला.

होळी अन् रंगपंचमीला रितेश देशमुखच्या ‘माऊली’ चित्रपटातील “धुवून टाक…” गाणं सर्वत्र दरवर्षी ट्रेंड होतं. “हा तर रंगाचा डाग…तुझ्या साडीला सर्फ लावून…धुवून टाक” असे या गाण्याचे बोल आहेत. अजय गोगावलेने हे गाणं गायलं असून आज ७ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

रितेश देशमुखच्या याच लोकप्रिय गाण्यावर कमळी अन् हृषीने ठेका धरला होता. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. महत्त्वाचं म्हणजे कमळी या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना नेहमीपेक्षा वेगळ्या आणि ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळतेय. व्हाइट शेडची डिझायनर साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज या लूकमध्ये कमळी खूपच सुंदर दिसतेय. मालिकेत कमळीची भूमिका अभिनेत्री विजया बाबर साकारत आहे. मात्र, या मालिकेमुळे आता विजयाला घराघरांत ‘कमळी’ म्हणून ओळखलं जातं.

कमळी-हृषीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “क्या बात है”, “वाह वाह मस्त डान्स केलात”, “लय भारी राव”, “वॉव किती छान”, “कडक डान्स”, “किती मस्त आहात तुम्ही दोघं”, “कमळी आणि हृषी सर कमाल डान्स”, “सुपर डान्स मस्त आनंदाने होळी साजरी करा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर युजर्सनी दिल्या आहेत.

दरम्यान, कमळी मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, ही मालिका झी मराठीवर वाहिनीवर दररोज ९ वाजता प्रसारित केली जाते.