Kamli Fame Ketaki Kulkarni’s Mother Talks About Her : केतकी कुलकर्णी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘कमळी’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. केतकी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. लहानपणापासून ती अभिनय क्षेत्रात काम करत आहे.
केतकीने लहानपणीच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. तिने ‘झी मराठी’वरील ‘अस्मिता’ मालिकेत काम केलं होतं. सध्या ती ‘कमळी’ मालिकेत अनिका ही भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या आई-वडिलांबरोबर ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिच्या आईने तिला लहानपणी असलेल्या आजाराबद्दल सांगितलं आहे.
केतकी कुलकर्णीच्या आईची प्रतिक्रिया
मुलाखतीत केतकीच्या आई स्वाती कुलकर्णी यांनी तिला लहानपणी असलेल्या आजाराबद्दल सांगितलं आहे. केतकीने या मुलाखतीत तिच्या आई-वडिलांना काही प्रश्न विचारले. यावेळी तिने त्यांना “मला वाढवताना, माझं संगोपन करताना तुम्हाला झालेला एखादा त्रास किंवा अव्हान कोणतं?” असं विचारलं. यावर तिची आई म्हणाली, “तिला एक आजार होता, पाच वर्षांची असताना ही कुठे पडली वगैरे तर श्वास रोखायची. श्वास घेणं बंद करायची.”
केतकीची आई पुढे म्हणाली, “बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं तर एक डॉक्टर म्हणाले की हा एक स्वभाव असतो. रडका स्वभाव तिचा लहानपणापासून आहे. डॉक्टर आम्हाला म्हणाले की हा एक स्वभाव असतो, ती अपमान सहन करू शकत नाही म्हणून ती रडता रडता श्वास रोखते. ही पहिली स्टेज आहे, पण तुम्ही काळजी घ्या. सगळं तिच्या मनासारखं करा. पाच वर्षांनंतर मग काय वळण लावायचं आहे ते लावा.”
अभिनेत्रीची आई पुढे म्हणाली, “मग ते पाच वर्ष आम्हाला तिला वाढवण्यात, शाळेत तिच्या क्रीडा शिक्षिकेला सांगण्यात, की हिला स्पोर्टसमध्ये पळवू नका; म्हणून ती स्पोर्टसमध्ये कमकुवत राहिली. कारण आम्हाला शिक्षकांना सांगावं लागलं की जोरात ओरडू नका, थोडी खबरदारी घ्या. तर ती पाच वर्ष हे सगळं करण्यात आम्हाला खूप त्रास झाला. आम्हाला खूप काळजी वाटायची की ती कधी श्वास बंद करून पडली वगैरे तर.”
