Vijaya Babar Video: झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या ‘कमळी’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहेत. हृषी कमळीच्या प्रेमात पडला आहे. मात्र, हे नयनताराला आवडत नाही. ज्यावेळी हृषीला समजले की कमळीच्या आईला गोळी लागली आहे, कमळी संकटात आहे, त्यावेळी तिच्या मदतीसाठी तो तिच्या गावी आला. मात्र, नयनताराचा याला विरोध होता. तो कमळीसाठी घराबाहेर पडला तर कायमचे संबंध संपतील असेही तिने बजावले. मात्र, हृषीने कमळीच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कमळीच्या आईचा मृत्यू झाला आहे. कमळी तिच्या वडिलांचा शोध घेत आहे. ते नेमके कोण होते, ते कसे होते, याचा ती शोध घेत आहे; तर हृषी, बंड्या, निंगी तिला नेहमीप्रमाणे मदत करत आहेत. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तिच्या या शोधात तिला मदत करत आहेत.
कमळी ही खेडेगावातील, दोन वेण्या, परकर पोलके घालणारी मुलगी आहे. असे असले तरी ती हुशार, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार मुलगी आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी, मैत्रिणीवर जीवापाड प्रेम करणारी अशी कमळी ही प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कमळी ही भूमिका अभिनेत्री विजया बाबरने साकारली आहे. आता कमळीचा खऱ्या आयुष्यातील एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला सुंदर व्हिडीओ
विजया बाबरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विजयाने पांढऱ्या रंगाचा वनपीस घातला आहे. केस मोकळे सोडले आहेत. तसेच ती पावसात भिजत असून पावसाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, तिच्या हातात फुलेदेखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मालिकेतील लूकपेक्षा तिचा हा लूक अत्यंत वेगळा असल्याचे दिसत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विजयाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “कमळी मॅडम गावातून मुंबईत आल्याचे दिसत आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप सुंदर”, आणखी एकाने लिहिले, “तू खूप सुंदर दिसत आहेस”, एकाने लिहिले, “सुंदर व क्यूट कमळी”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. योगिनी चौक, मेघना एरंडे, सृष्टी बहेकर यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.


दरम्यान, कमळी लवकरच गावातून मुंबईला येणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. आता आगामी काळात मालिकेत आणखी काय ट्विस्ट येणार, राजनच तिचे वडील आहेत हे तिला कधी समजणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
