Kamali Serial Promo : कमळीला जवळपास वर्षभराने तिच्या आबांच्या निधनाचं सत्य समजतं. यानंतर ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि पुन्हा एकदा शहरात जाण्यास नकार देते. त्यामुळे कमळीची मनधरणी करण्यासाठी हृषी तिच्या गावी येतो. कमळीच आपल्या लेकाला जाळ्यात अडकवतेय असा समज नयनतारा करून घेते आणि गावी येऊन ती या मायलेकींचा अपमान करते. यानंतर कमळीची आई तिला भूतकाळातील सर्वात मोठं सत्य, तिची खरी ओळख सांगण्याचा निर्णय घेते. पण, कमळीची आई तिला सगळं सांगणार इतक्यात कामिनीचे गुंड तिच्यावर गोळी झाडतात.
या हल्ल्यात कमळीच्या आईचा मृत्यू झालाय असा समज सर्वांनी करून घेतलाय. पण, प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या अपघातातून गौरी बचावली आहे. तिला बराच मार लागलाय…पण, या सगळ्यातून ती हळुहळू सावरतेय. दुसरीकडे, कमळीला आपल्या आईचं नाव सरोज नसून गौरी आहे. आबांचं जुनं घर या सगळ्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत.
कमळीला धीर देण्यासाठी स्वत: अन्नपूर्णा आणि राजन गावी गेले होते. आजीचं ऐकूनच कमळी पुन्हा एकदा आपलं शिक्षण सुरू करणार आहे. यादरम्यान, कमळी साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे. मंदिरात प्रार्थना करून ती अन्नपूर्णाने आयोजित केलेल्या साईभंडाऱ्यात सहभागी होईल.
कमळी म्हणते, “मला माहितीये…ज्याचा कोणी नसतो, त्याचा साईनाथ असतो” यावेळी देवळात भंडाऱ्यासाठी प्रसाद बनवला जात असतो. कामिनी गुपचूप सर्वांची नजर चुकवून त्याठिकाणी पोहोचले आणि ती या प्रसादात विष मिसळते. आता याचा काय परिणाम होणार हे येत्या भागात प्रेक्षकांना कळेल.
पण, प्रसादाच्या पंगतीत गौरी सुद्धा उपस्थित असते…यादरम्यान कमळी सुद्धा जेवण वाढण्याचं काम करत असते. आता साईबाबांच्या कृपेने कमळी आणि आईची भेट होणार का? या दोघी समोरासमोर आल्यावर गौरी तिला बाबांचं सत्य सांगेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
दरम्यान, ‘कमळी’ मालिकेचा हा विशेष भाग १४ जुलैला रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
