Zee Marathi Kamali Serial : कमळीची आई कायमचं हे जग सोडून गेली असा गैरसमज अनेकांना झाला होता. पण, एवढ्या मोठ्या अपघातामधून सुद्धा गौरी ( सरोज ) सुखरुप बचावते. मात्र, डोक्याला दुखापत झाल्याने कमळीच्या आईची स्मृती गेली आहे. तिला काहीच आठवत नसतं. मात्र, आपल्या लेकीच्या बालपणाबद्दल तिला सगळं माहिती असतं…पण, कमळीला प्रत्यक्ष ती ओळखूही शकत नाहीये. गौरीला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. त्यामुळे कमळीवर आईची जबाबदारी असते.
कमळी सुद्धा अगदी मनापासून आपल्या आईची सेवा करतेय. या सगळ्यात तिला हृषीची, निंगीची मोठी साथ मिळतेय. पण, आता कमळीला सुखाने जगू न देण्यासाठी अनिका पुन्हा एकदा एक प्लॅन रचणार आहे. मुलींच्या हॉस्टेलमध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नसते. त्यामुळे कमळीच्या खोलीत तिचे कोणीही नातेवाईक राहू शकत नाही, तिने हॉस्टेलचे नियम मोडलेत असा दावा अनिकाकडून केला जातो.
हॉस्टेलच्या नियमांनुसार आता कमळीला तिची राहती जागा सोडावी लागणार आहे. मुंबईत कमळीच्या ओळखीचं कोणीच नसतं. अशा कठीण प्रसंगी कमळी, तिची आई आणि निंगी कुठे जाणार असा प्रश्न सर्वांना पडतो. आता कमळी कायमची गावी जाईल अशा भ्रमात अनिका असू शकते. पण, आता हृषी स्वत: पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणार आहे.
हृषी या तिघींना घेऊन स्वत:च्या घरी जातो. कमळीला पाहून नयनतारा थेट म्हणते, “हे काय मी फक्त तुला घरी बोलावलं होतं.” यावर हृषी आपल्या आईला म्हणतो, “आई अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे. आता याला अट समजायची असेल तर तसं समज…पण, जर मी तुला या घरात यायला हवा असेन तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावं लागेल.”
आता नयनतारा हृषीची ही अट कशी मान्य करणार का? यादम्यान कमळीच्या आईची स्मृती पुन्हा येईल का? या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळतील.
दरम्यान, २३ जुलैला गुरुवारी हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता कमळी नयनताराचं मन पुन्हा एकदा कशी जिंकून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
