Kamali Serial Promo : ‘कमळी’ला आपल्या खऱ्या कुटुंबाविषयी कोणतीही माहिती नसते. आपली आई अन् आबा हेच आपलं कुटुंब… एवढंच कमळीला ठाऊक असतं. या दोघांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती गावातून शहरात येते आणि इथेच कमळीच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळते. काही दिवसांपूर्वीच आपण मालिकेत पाहिलं, नयनताराने कमळी आणि हृषीच्या नात्याला विरोध केला आहे. यावेळी नयनताराने कमळीला तिच्या बाबांची ओळख विचारली आणि तिच्या आईच्या चारित्र्याबाबत भाष्य केलं. यामुळे कमळीसह तिची आई दोघीही प्रचंड दुखावल्या गेल्या.

आपल्या मुलीला सगळेजण येता-जाता तिच्या बाबांची ओळख विचारत आहेत ही गोष्ट गौरीला ( सरोज ) फार खटकत असते. त्यामुळे ती कमळीला सत्य सांगण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे, कमळीच अन्नपूर्णाची खरी मोठी नातं असल्याचं सत्य कामिनीला सुद्धा समजलंय. त्यामुळे कामिनी कमळीला जीवे मारण्याचा प्लॅन तयार करते. याच दिवशी सरोज सुद्धा आपल्या लेकीला तिची खरी ओळख सांगणार असते. पण, याचा काहीच उपयोग होत नाही. कामिनी गुंडाना पैसे देऊन कमळीवर गोळीवर झाडण्यास सांगते पण, ही गोळी सरोजला लागते आणि तिचा यात मृत्यू होतो.

आईच्या निधनानंतर कमळी प्रचंड कोलमडून जाते. याशिवाय ती राजनची मुलगी आणि अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात आहे हे सत्य सुद्धा कमळीपर्यंत पोहोचत नाही. राजन-अन्नपूर्णा जेव्हा कमळीची विचारपूस करण्यासाठी गावी जातात…तेव्हाही हे दोघं नेमके तिच्या आईचा फोटो बघत नाही. त्यामुळे अजूनही कमळीचं सत्य कोणासमोरही आलेलं नाहीये.

याशिवाय, दुसरीकडे अनिका कॉलेजमध्ये कमळीचे ॲडमिशन पेपर्स फाडून टाकण्याच्या तयारित असते. “कमळीचं ॲडमिशन कॅन्सल करा आता ती येणार नाहीये…” पण, इतक्यात कमळी तिथे पोहोचते आणि तिला फॉर्म फाडण्यापासून अडवते. कमळी अनिकाला म्हणते, “तुला काय मी हरलेय असं वाटलं? जखमी वाघीणाला डिवचायला जाऊ नकोस…तुला एका घावात फाडून ठेवेन!”

आई अन् आबांच्या निधनानंतर खचलेली कमळी आता एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तिची कॉलेजमध्ये रिएन्ट्री झालेली आहे. आता कमळीची आई खरंच तिला कायमची सोडून गेलीये…की ती सुद्धा पुन्हा येणार हे लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. ही मालिका ६-७ जुलैला रात्री ९ वाजता प्रसारित केली जाईल.