अलीकडच्या काळात मालिकांचं शूटिंग हे साधारण १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे दैनंदिन मालिकांमध्ये काम करणाऱ्या बहुतांश सगळ्याच कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान असतं. ‘कमळी’ मालिका गेली वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका आघाडीवर आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार एकत्र मान्सून ट्रिपला गेले होते. याचे खास फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कमळी मालिकेतील सगळ्याच कलाकारांचं एकमेकांशी खूप छान बॉण्डिंग आहे. हे सगळे कलाकार एकत्र फिरायला गेले होते. या सगळ्यांनी खास वन-डे Villa ट्रिप प्लॅन केली होती. हृषी, कमळी, निंगी, कमळीची आई सरोज, आजोबा, नायशा, सायबा, बंड्या या सगळ्या कलाकारांनी मिळून सलमान खानच्या ‘Just Chill’ गाण्यावर डान्स सुद्धा केला. या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे मालिकेत आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रदीप पंडित यांचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

या सगळ्या कलाकारांनी व्हिलाच्या हॉलमध्ये खास फोटोशूट सुद्धा केलं आहे. “ट्रिपचं प्लॅनिंग यशस्वी झाल्यावर आमचे आनंदी चेहरे” असं कॅप्शन कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने या ग्रुप फोटोला दिलं आहे. यामध्ये सगळ्याच कलाकारांचा नेहमीपेक्षा वेगळा अन् काहीसा मॉडर्न अंदाज पाहायला मिळत आहे. विशेषत: कमळी प्रेक्षकांना नेहमी साध्याभोळ्या लूकमध्ये, दोन वेण्या घालून दिसते…पण, व्हिलाच्या फोटोंमध्ये कमळी वेस्टर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

kamali serial news
कमळी मालिकेतील कलाकार पोहोचले पिकनिकला

“चिल कार्यक्रम”, “भारीच”, “आजोबा रॉक्स”, “रोहित दादा मस्त डान्स करत आहेत”, “एन्जॉय करा”, “तुमचं सर्वांचं बॉण्डिंग भारीये”, “मस्त डान्स केलात…आजोबांचा डान्स सर्वात भारी”, “खूप छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या फोटोंवर अन् डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. ‘कमळी’ ही मालिका रोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते.