Zee Marathi Kamali Serial : ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत पुढच्या १० दिवसांत अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. नुकताच अनिकाचा खरा चेहरा कमळीसमोर उघड झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिका चांगुलपणाचं नाटक करतेय. कमळीला गोड बोलून ती इतके दिवस फसवत होती आणि या सगळ्यामुळे कमळीवर कॉलेजमधून निलंबित होण्याची वेळ सुद्धा आली. पण, अखेर हृषी आणि निंगीच्या साथीने कमळीने या सगळ्याचा शोध लावला आहे.
कमळीला बदनाम करण्यामागे अनिका आणि कामिनी आहेत…हे सत्य जेव्हा हृषी, कमळीसमोर येतं तेव्हा या दोघांनाही धक्का बसतो. पण, याउलट निंगीला अनिकावर पहिल्यापासूनच संशय असतो. आता कमळी कारस्थानी कामिनीच्या बाबतीत अलर्ट झालेली आहे. पण, आता कामिनी असा काही डाव खेळणार आहे…ज्यामुळे कमळीची महाजनांच्या घरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे.
कमळी ही महाजनांची खरी नात आहे हे सत्य फक्त कमळीच्या आईला माहीत असतं. राजनने फक्त अन्नपूर्णाची प्रकृती ठिक व्हावी यासाठी तिला हे नाटक करायला लावलेलं असतं. राजन आणि कमळीचा प्लॅन आता कामिनी, अनिका आणि रागिणीला समजला आहे. त्यामुळे कामिनी कमळीला ओपन चॅलेंज देते.
कामिनी म्हणते, “पिते दूख डोळे मिटुनी… तू महाजनांची खरी नात नाहीयेस…आता फक्त १० दिवस मग तुला कळेल कामिनीचा डाव…म्हणजे कसा वर्मावर घाव!” यावर सडेतोड उत्तर देत कमळी सांगते, “माझ्या या एका खोट्याने अन्नपूर्णा आजींचा जीव वाचणार असेल तर ही कमळी वाटेल ते करायला तयार आहे.”
कमळी आणि कामिनी यांच्यामध्ये आता पैज लागणार आहे. आता या दोघींमध्ये ही पैज कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, कमळीच्या मनात पाप नसतं….आजी बऱ्या व्हाव्यात हा तिचा एकमेव हेतू असतो. तर, कामिनीला सगळी प्रॉपर्टी हवी असते. कामिनी पुराव्यानिशी कमळी-राजनचा प्लॅन उघडकीस आणला तर, अर्थातच अन्नपूर्णाला मोठा धक्का बसेल आणि कमळीला महाजनांचं घर सोडावं लागेल.
आता कमळीला घराबाहेर काढल्यावर गौरी सर्वांसमोर येईल का? कमळी आणि तिच्या आईची भेट केव्हा होईल? की या पैजेत अनपेक्षितपणे कमळीच बाजी मारेल हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘कमळी’चा हा विशेष भाग २० एप्रिलला रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित केला जाईल. प्रेक्षक सुद्धा या मालिकेत पुढे काय घडणार? हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
