Marathi Serial TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेली तीन वर्षे अर्जुन-सायलीची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर आणि पहिल्या स्थानी आहे. या आठवड्यात सुद्धा ‘ठरलं तर मग’चं पहिलं स्थान कायम आहे मात्र, येत्या काळात ‘ठरलं तर मग’ आणि ‘कमळी’मध्ये नंबर वन मिळवण्यासाठी जोरदार चुरस निर्माण होऊ शकते असं चित्र सध्या निर्माण झालं आहे.
‘BARC इंडिया’ने नुकतीच ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यानची टीआरपीची आकडेवारी जाहीर केली. या यादीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही महिने ‘ठरलं तर मग’ पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका असायची. पण, आता हे दुसरं स्थान ‘कमळी’ने मिळवलं आहे. कमळीची महाजनांच्या घरात एन्ट्री झाल्याचा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे.
‘ठरलं तर मग’ आणि ‘कमळी’ या दोन मालिकांपाठोपाठ तिसरं स्थान पटकावलंय तारिणीने. ‘तारिणी’ मालिकेच्या टीआरपीत मोठी वाढ झाली असून ही मालिका तिसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे. ‘तारिणी’ने आधीच्या तुलनेत टीआरपीच्या शर्यतीत मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका आता चौथ्या स्थानी घसरली आहे. ‘वीण दोघांतली तुटेना’, ‘नशीबवान’ या मालिकांचा TVR सुद्धा ३.७ एवढाच आहे.
मराठी मालिकांचा टीआरपी
- ठरलं तर मग – ४.५
- कमळी – ४.३
- तारिणी – ३.९
- तू ही रे माझा मितवा – ३.७
वीण दोघांतली ही तुटेना – ३.
नशीबवान – ३.७ - लक्ष्मी निवास – ३.४
- लग्नानंतर होईलच प्रेम – ३.२
देवमाणूस – ३.२
मी सावित्रीबाई जोतिराव फुले – ३.२ - वचन दिले तू मला – ३.०
- तुझ्या सोबतीने – २.८
- शुभ श्रावणी – २.६
- तुला जपणार आहे – २.४
स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या मालिकांना सध्या अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. ‘तुझ्या सोबतीने’, ‘वचन दिले तू मला’ या दोन्ही मालिकांचा टीआरपी कमी झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात झी मराठीच्या पाच मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत.
दरम्यान, कमळी मालिकेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मालिकेची लोकप्रियता अशीच वाढत रहिली तर ‘कमळी’ ‘ठरलं तर मग’ला सुद्धा टक्कर देऊ शकेल असं बोललं जात आहे. आता कमळी मालिकेत येत्या काही दिवसांत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

