Zee Marathi Kamali Promo : ‘कमळी’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनिका मोठ्या हुशारीने वेगवेगळे डाव रचतेय. हुबेहूब कमळीसारखी वेशभूषा करून… अनिका चोरी करणं, धमक्या देणं असं सगळं काही करतेय पण, या सगळ्यात दोषी ठरतेय ती कमळी! खरंतर कॉलेजमध्ये चोरी करण्याचं काम अनिका करते पण, तिने कमळीसारखा लूक केल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमळी दोषी आढळते. या सगळ्याचा कमळीच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होणार आहे.
चोरीचं प्रकरण थेट मुख्याध्यापक सरांपर्यंत पोहोचतं आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना कॉलेजच्या ट्रस्टी असणाऱ्या अन्नपूर्णा आजींना देखील दिली जाते. चौकशीअंती कमळीला कॉलेजमधून Suspend करण्यात येणार आहे. हा कमळीसाठी खूप मोठा धक्का असतो. पण, या सगळ्याहून मोठी गोष्ट म्हणजे…हे सगळं आपल्या नावाने कोण करतंय? याचा कमळीला शोध घ्यायचा असतो. कमळीची जिवलग मैत्रीण निंगीला आता थोडाफार अनिकावर संशय आलेला आहे. पण, या सगळ्यातून ‘कमळी’ कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हृषी करणार कमळीला मदत
सगळेजण कमळीच्या विरोधात असताना एक व्यक्ती तिच्या पाठिशी ठामपणे उभा राहील. तो म्हणजे हृषी. कॉलेजमधून Suspend केल्यामुळे आता हृषी स्वत: घरच्या घरी कमळीचा अभ्यास घेणार आहे. सुरुवातीला नयनताराला कमळीने असं घरी आलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती विविध कारणं शोधून हृषीला अडवण्याचा प्रयत्न करते. स्टडी रूममध्ये काम सुरूये, हॉलमध्ये माझी मिटींग सुरूये वगैरे… पण, शेवटी हृषी “मी आणि कमळी माझ्याच रूममध्ये बसून अभ्यास करतो” असं सांगतो. नयनतारा काही बोलायच्या आत हृषी निघून गेलेला असतो. त्यामुळे ती या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी सरोजला पाठवते.
सरोजच कमळीची आई आहे हे सत्य अद्याप कोणाला माहिती नाहीये. नयनताराने सांगितल्याप्रमाणे सरोज हृषीच्या खोलीत जाते. तिथे ती कमळीला पाहते आणि पटकन आपलं तोंड लपवून घेते. आता या मायलेकींची भेट आता तरी होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “किती दिवस लागणार आहेत अजून या दोघी भेटल्या नाहीयेत”, “अजून सहा महिने वाढवा”, “भेट होणारच नाहीये…माहितीये आम्हाला”, “यांच्या भेटीचा ट्रॅक जरा लवकर आणा” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
