scorecardresearch

“मी कोणाच्या बापाला…” भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काम्या पंजाबीचे वक्तव्य चर्चेत

गेल्याचवर्षी काम्याने कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं

“मी कोणाच्या बापाला…” भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काम्या पंजाबीचे वक्तव्य चर्चेत
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे गेल्या दोन महिन्यांपासून ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून देशभर फिरत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीनेसुद्धा बुधवारी (४ डिसेंबर)ला भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशात आल्यानंतर काम्या पंजाबी राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी झाली. काम्या व राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा व्हिडीओ कॉंग्रेसच्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “अन्याय व तिरस्काराच्या विरोधात उठणारी पावलं भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यामुळे आमची शक्तीही वाढत आहे”, असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. काम्यानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : मनोज वाजपेयीचे ट्विटर अकाऊंट हॅक; अभिनेता इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून म्हणाला…

गेल्याचवर्षी काम्याने कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं शिवाय आपल्या पक्षाप्रती असलेली निष्ठासुद्धा तिने दाखवली होती. काम्याने माध्यमांशी संवाद साधताना यात्रेतील अनुभव आणि या यात्रेत सामील होण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. पत्रकारांशी संवाद साधताना काम्या म्हणाली, “बऱ्याच लोकांना या यात्रेत सहभागी होण्याची इच्छा आहे, पण नंतर त्यांना लोकांची टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागेल या भीतीपोटी ते या यात्रेत सहभागी होणार नाही.

माध्यमांशी बोलताना काम्याने दिलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. काम्या म्हणाली, “या यात्रेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी सगळ्यांशी संवाद साधतात, सगळ्यांना ते आपलं मानतात. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. राहुल गांधींना समर्थन द्यायला मला कसलीच भीती वाटत नाही. यात्रेदरम्यान त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झाली आणि त्यांना भेटून फार आनंद झाला.” राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत याआधीही अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पूजा भट्ट, रिया सेन, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी, अमोल पालेकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 19:04 IST

संबंधित बातम्या