scorecardresearch

‘शेहजादा’ चित्रपटातील क्रिती सॅनॉनच्या ‘त्या’ संवादाची कपिल शर्माने उडवली खिल्ली; अभिनेत्री संतापून म्हणाली…

हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा रिमेक आहे

kriti sanon kapil sharma
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘द कपिल शर्मा शो’ मागच्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. हा कार्यक्रम चर्चेत येतो ते म्हणजे यात आलेल्या कलाकारांमुळे अथवा या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांनी जर कार्यक्रमातून एक्झिट घेतली तर, या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे कपिल आपल्या शैलीत स्वागत करतोच मत त्यांची खिल्लीदेखील उडवत असतो. नुकतेच कार्तिक आर्यन क्रिती सॅनॉन या कार्यक्रमात आले होते. तेव्हा क्रितीने कपिलला असे उत्तर दिले की त्यावर कपिल निशब्द झाला.

कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन सध्या चर्चेत आहेत. त्यांचा ‘शेहजादा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ते कपिल शर्माच्या कार्यक्रमात आले होते. नुकताच याचा प्रोमो व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात कपिल कार्तिकला म्हणाला की “चित्रपटात तू क्रितीची खूप स्तुती करत आहेस, मात्र नंतर वेगळं बोल्ट्स तर ते स्क्रिप्टमध्ये होत की भोपाळमधील काही गोष्टी आठवल्या का?” त्यावर कार्तिकने दुजोरा दिला. लगेच कपिलने क्रितीकडे मोर्चा वळवला तो असं म्हणाला, “क्रिती म्हणते लांब पाय असलेल्यांची लाथ बसू शकते कधी याचा वापर केला आहे?” त्यावर कपिलकडे बघत म्हणाली “दाखवू का करून?” तिच्या या रिप्लायवर सगळे हसायला लागले. चित्रपटात तिच्या तोंडी हा संवाद आहे.

Video : “यात भाजपाची चूक, आप ने तर…” अनुपम खेर दिल्लीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल

‘शेहजादा’ चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता मात्र शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला तूफान प्रतिसाद बघता ‘शेहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रापाचे प्रदर्शन लांबवले असून हा चित्रपट आता १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल.

हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करत असून, कार्तिकबरोबर क्रिती सॅनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:23 IST