‘द कपिल शर्मा शो’ने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमातील हलके-फुलके विनोद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणत असतात. आजही या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. पण आता लवकरच हा कार्यक्रम काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशा चर्चा गेले काही दिवस रंगल्या आहेत. आता अखेर कपिल शर्मा याने याबाबत मौन सोडलं आहे.

जून महिन्यात या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होईल. त्यानंतर हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद राहिल. यापूर्वी हा कार्यक्रम काही काळ बंद होता. विनोद निर्मिती करणे हे कठीण काम आहे. त्यामुळे कार्यक्रमातील कलाकारांना थोडे विश्रांती देऊन त्यांना नंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करता येतं. याचबरोबर कास्टमध्ये काही बदल करायचे असल्यास ते करायला देखील वेळ मिळतो. याचबरोबर काही दिवसानंतर कपिल शर्माला काही कामानिमित्त परदेशी जायचं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ब्रेक लावण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असं बोललं जात होतं. आता खुद्द कपिलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

आणखी वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्मा म्हणाला, “अजून याबाबत काहीही निश्चित झालेलं नाही. आम्हाला जुलै महिन्यात आमच्या एका लाइव्ह शोंसाठी अमेरिकेला जायचं आहे आणि तेव्हा ठरवलं जाईल की त्यावेळी काय करायचं. त्यामुळे याविषयी काहीही बोलण्यासाठी अजून खूप वेळ आहे.”

हेही वाचा : एका एपिसोडसाठी ५० लाख फी आकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती किती? स्वतःच खुलासा करत म्हणाला, “माझ्याकडे…”

त्यामुळे या कार्यक्रमाबाबत निर्माते काय निर्णय घेतात याकडे या शोच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लवकरच याबाबत अधिक माहिती निर्मात्यांकडून दिली जाईल.