scorecardresearch

कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास मनाई; चॅनलने घातली बंदी, कारण…

कपिल करीनाच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये आला होता. त्यावेळेस त्याने विनोदी जगतात झालेल्या बदलांबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

kapil sharma
कपिल शर्मा (संग्रहित छायाचित्र)

कॉमेडी व्यतिरिक्त कपिल शर्मा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झ्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये कॉमेडियन बॉलीवूडच्या बेबो म्हणजेच करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शोचा भाग बनण्यासाठी आला होता. या कार्यक्रमात त्याने आपल्या कारकिर्दीपासून विनोदी जगतात झालेल्या बदलांबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. दरम्यान, कपिल शर्माने अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा- “घरगुती हिंसाचार, घटस्फोट, दुसरं लग्न अन्…”, आता प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायचंय आई; म्हणाली, “बाळ दत्तक…”

टॉक शो दरम्यान करिनाने कपिल शर्माला अनेक प्रश्न विचारले. करीना म्हणाली ‘एक समाज म्हणून आपण सतत पुढे जात आहोत, लोकांची विचारसरणी बदलत आहे. १० वर्षांपूर्वी ज्या गोष्टी खूप मजेदार होत्या, आज लोक त्यांचा विरोध करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या टीमसोबत शोची स्क्रिप्ट लिहिता तेव्हा तुम्ही त्याबद्दल खूप काळजी घेता का? आपण असे बोलू नये किंवा लोकांची अशा प्रकारे चेष्टा करू नये असे कधी तुमच्या मनात आले आहे का?’ असा प्रश्न तिने कपिलला विचारला.

हेही वाचा- ‘अर्जून कपूर आणि मलायकाची जोडी म्हणजे..’; ‘त्या’ व्हिडिओवरून दोघे पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

करिनाच्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणाला, ‘खरं सांगायचं तर असं अनेकदा झालंय. मी पंजाबचा आहे आणि या गोष्टी तिथे खूप घडतात. वराची मंडळी अनेकदा वधूच्या मंडळींची चेष्टा करतात. तिथले लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. या सर्व गोष्टी आपल्या संस्कृतीचा भाग होत्या, पण आज लोक याला बॉडी शेमिंग म्हणतात. पुढे कपिल म्हणाला सामान्य मनोरंजन चॅनेलचा एक भाग असल्याने, तुम्हाला अनेक शब्दांवर SNP (मानक आणि पद्धती) दिले जातात. यातील काही शब्द असे आहेत की तुम्ही त्यांचा विचारही करू शकत नाही.

हेही वाचा- सलमान खानला जूही चावलाशी करायचं होतं लग्न; तिच्या वडिलांची भेटही घेतली होती, पण….

कपिल शर्माने खुलासा केला की, ‘माझ्या चॅनलने ‘वेडा’ हा शब्द बोलल्यामुळे माझ्यावर बंदी घातली आहे. मी हा शब्द वापरू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी मी यामागचे कारण विचारले असता त्याचे उत्तर असे की लोक यामुळे नाराज होतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 14:57 IST

संबंधित बातम्या