‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘वागळे की दुनिया’ अशा कॉमेडी शोमध्ये नाना पाटेकर यांची नक्कल करणारा अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी फेसबुक लाइव्ह पाहिल्यानंतर जवळच्या पोलीस स्थानकात फोन केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? यामागच्या कारणांचा खुलासा तीर्थानंदने केला आहे.

हेही वाचा- “त्याने मला पॅन्ट काढायला सांगितली आणि…,” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

तीर्थानंद पुढे म्हणाला की, “तिला माझ्या घरात वाटा हवा आहे. नुकताच मी तिला दोन लाखांचा फोनही दिला. ‘माझ्या शरीरात विष पसरले होते, पण सुदैवाने त्यावर वेळीच उपचार झाले आणि आता मी बरा आहे. मला माझ्या कृतीची लाज वाटते पण माझ्याकडे पर्याय नव्हता. तिचे खोटे केस मागे घ्यावेत आणि या सगळ्यातून माझी सुटका करावी अशी माझी इच्छा आहे. मी माझे सर्व पैसे खर्च केले आहेत. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.”

हेही वाचा- Video: “मगमध्ये चहा, कॉफी नाही तर…,” रुपाली भोसलेने शेअर केलेला ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीर्थानंदने करोना काळात लॉकडाऊन दरम्यानही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “त्यावेळी माझ्याकडे काम नसल्यामुळे मी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होतो. परिणामी मी आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचललं होतं.”