Kapil Sharma Talks About Depression : अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी कधीच अभिनय करण्याचा विचार केला नव्हता; पण कालांतराने ते या क्षेत्रात आले. त्यापैकीच एक नाव म्हणजे कपिल शर्मा. कपिल शर्मानं त्याच्या संघर्षकाळाबद्दलची माहिती दिली आहे.
कपिल शर्माने त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं आतापर्यंत खूप मनोरंजन केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, त्याला अभिनेता नाही, तर गायक व्हायचं होतं आणि एवढंच काय तर त्यानं अभिनेता झाल्यानंतरही विनोदी भूमिका करण्याबद्दल काहीच नियोजन नव्हतं; पण ओघाओघानं सगळं घडत गेलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं तो नैराश्यात गेला होता. त्याबद्दलची माहिती दिली आहे.
नैराश्याबद्दल काय म्हणाला कपिल शर्मा?
ई टाइम्सशी संवाद साधातना कपिल म्हणाला, “३६ व्या वर्षी मी नैराश्यात गेलो होतो, मी खूप खचलो होतो. लोकांनी तू संपलास, असं म्हणायला सुरू केलेलं. त्यानंतर माझं लग्न झालं. मग पुन्हा माझा शो सुरू झाला आणि मी ३०० हून अधिक एपिसोड केले.” पुढे त्यानं अस्थिरताच खरी स्थिरता आहे. कारण- त्यामुळे माणूस आलेलं काम निर्मळ भावनेनं करत असतो, असं म्हटलं आहे.
कपिल पुढे त्याचे वडील जितेंद्र कुमार पुंज, जे पंजाबमध्ये पोलिस म्हणून काम करायचे, ज्यांचं २००४ मध्ये सात वर्षं कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर निधन झालं. त्यांच्याबद्दलही सांगितलं आहे. पुढे त्यानं जेव्हा तो ग्रेट इंडियन लाफटर चॅलेंज सीझन ३ ची ट्रॉफी जिंकला तेव्हा त्याला १० लाखांचा चेक मिळाल्यानंतर तो वडिलांच्या आठवणीत रडत होता.
वडिलांबद्दल कपिल म्हणाला, ‘जेव्हा माझा शो सुरू झाला, तेव्हा मला आठवतंय की, मी माझ्या घराबाहेर रात्री ९ वाजता उभा होतो. सोसायटीतील प्रत्येक घरात टीव्ही सुरू होता आणि लोकांच्या हसण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की, जर आता बाबा असते, तर त्यांना किती आनंद झाला असता. मी त्यांना दररोज मिस करतो.”
दरम्यान, कपिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलीकडेच आलेल्या त्याच्या ‘किस किसको प्यार करू २’मधून झळकलेला. हा चित्रपट २०१५ साली आलेल्या त्याच्या किस किसको प्यार करू या चित्रपटाचा सीक्वेल आहे. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. नुकताच नेटफ्लिक्सवर कपिलच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा चौथा सीझन सुरू झाला आहे.
