सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर- एक प्रेम कथा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. दरम्यान, आता दिग्दर्शक अनिल शर्मा पुन्हा एकदा सनी आणि अमिषासोबत ‘गदर २’ बनवत आहेत. या चित्रपटात अनिल शर्माचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील आहे, तो सनी आणि अमिषाच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्कर्षने पहिल्या भागात सनी देओलच्या मुलाची भूमिका केली होती.

हेही वाचा – “…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘गदर २’ बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच या चित्रपटासंदर्भात एक रंजक बातमी समोर आली आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माने सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर’ चित्रपटात काम केलं होतं. पण नंतर त्याची भूमिका चित्रपटातून कट करण्यात आली होती. कपिल शर्माने आपल्या टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याचा उल्लेख केला होता. कपिलने सांगितलं होतं की त्याचे वडील पोलिसांत होते आणि पंजाबमध्ये ‘गदर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याच्या वडिलांची त्याठिकाणी ड्युटी होती. तिथे कोणीतरी अशी अफवा पसरवली होती की जो कोणी शूटिंगचा भाग असेल त्याला सनी देओलला भेटण्याची संधी मिळेल. पण त्यावेळी सनी देओल तिथे आलाच नव्हता, असं नंतर कळालं.

हेही वाचा – पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटाबद्दल बोलला इशान खट्टर; म्हणाला, “भाऊ शाहिद कपूरने…”

कपिल शर्माने सांगितलं की शूटिंगसाठी अमिषा पटेल आणि अमरीश पुरी तिथे होते. कपिलसोबत त्याचे मित्रही होते. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की अॅक्शन बोलताच त्यांना ट्रेनमध्ये चढायचं आहे, कपिल दोन-तीन वेळा ट्रेनमध्ये चढला पण त्याला वाटलं की एवढ्या गर्दीत त्याचा सीन येणार नाही.

हेही वाचा – “आपल्या समाजात…”, चित्रपटांमुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांवर नीना गुप्तांनी मांडलं मत

“अॅक्शन डायरेक्टर टीनू वर्मा जीपवर उभे राहून सांगत होते, तेवढ्यात मला एक रिकामी जागा दिसली म्हणून मी तिकडे धावलो, मी एकटाच त्या दिशेने धावलो आणि मला क्रूने पकडलं. त्यानंतर त्यांनी मला शिव्याही दिल्या. मी त्यांना सांगितलं की अॅक्शन म्हटलं होतं म्हणून मी धावत गेलो, पण नंतर त्यांनी मला पळवून लावलं. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी मित्रांना माझा सीन दाखवण्यासाठी सिनेमागृहात घेऊन गेलो, पण तो सीन कट करण्यात आला होता,” असंही कपिलने सांगितलं होतं.