करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. करण-तेजस्वी बिग बॉसच्या १५ व्या सीझनमध्ये एकत्र सहभागी झाले होते, याचठिकाणी त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. मध्यंतरी करण-तेजस्वीचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर आता करण कुंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : ‘चंद्रमुखी’ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार; आई-वडिलांचा फोटो शेअर करीत अमृता म्हणाली, “माझ्या पालकांनी…”

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

करण कुंद्राने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “आम्ही दोघेही एकमेकांबरोबर खूप आनंदी आहोत. सोशल मीडियावर काही लोक सत्य जाणून न घेता तेजस्वी आणि माझ्या नात्याबाबत स्वत:च निष्कर्ष काढतात हे पाहून सुरुवातीला मला धक्काच बसला. काही लोकांनी तेजस्वीच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्ससुद्धा केल्या होत्या. मी तेजस्वीने शेअर केलेले सर्व फोटो लाइक करतो की नाही? त्यावर कमेंट करतो की नाही? एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींचे लोक निरीक्षण करीत असतात. तेजस्वीने एखादा फोटो पोस्ट केला की, त्यावर एका तासात हजार कमेंट्स आलेल्या असतात आणि मला टॅग करून फोटो आवडला नाही का ? असे लिहिलेले असते. अशा लोकांना कोण सांगणार, तिचे जास्तीत जास्त फोटो मीच काढलेले असतात.”

हेही वाचा : शरद केळकरने सांगितला ‘आदिपुरुष’च्या हिंदी डबिंगचा अनुभव, म्हणाला “दिग्दर्शकाला पहिल्या दिवसापासून…”

करण पुढे म्हणाला, “सोशल मीडियावर आमच्या नात्याबद्दल अशा चर्चा सुरू आहेत याची माहिती मला माझ्या पीआर टीमकडून मिळाली. त्यांनी कॉल करून मला यासंदर्भात कल्पना दिल्यावर मला धक्काच बसला. काही लोकांनी आम्ही तेजस्वी आणि तुला एकत्र आनंदी पाहू शकत नाही, असेही लिहिले होते. जे लोक आमच्या नात्याबाबत असा नकारात्मक विचार करतात ते आमचे चाहते असू शकत नाहीत. असे लोक समाजात फक्त नकारात्मकता पसरवण्याचे काम करतात.”