‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री झनक शर्माने साखरपुडा उरकला आहे. झनक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याबद्दल चाहत्यांना सांगितलं. तिने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली झनक लवकरच लग्न करणार आहे. झनकची आई सुप्रिया शुक्ला यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रेमळ जोडप्याचा फोटो शेअर केला आहे. जिथे दोघे एकत्र बसलेले एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसतात. तसेच झनकनेही काही फोटो शेअर केले आहेत. ती फिटनेस ट्रेनर स्वप्नील सूर्यवंशीसोबत लग्न करणार आहे. “अखेर मी जाहीर करतेय की साखरपुडा झाला आहे,” असं कॅप्शन झनकने फोटोला दिलं आहे. झनकच्या या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Aurangzeb seated on a golden throne
‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?
why arrest arvind kejriwal excise case
विश्लेषण : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवालांचे नाव नाही, तरीही मनी लाँडरिंग अंतर्गत कारवाई का?

कोण आहे झनक शुक्ला?

२६ वर्षांच्या झनक शुक्लाने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. तिने ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत रोबोटिक गर्ल करिश्माची भूमिकाही साकारली होती. याशिवाय तिने ‘वन नाइट विथ किंग’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं होतं. तिने शाहरुख खानचा ‘कल हो ना हो’ या चित्रपटात प्रिती झिंटाची धाकटी बहीण जियाची भूमिका केली होती.

झनक सध्या काय करते?

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, झनकचा सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे जास्त कल होता. त्यामुळेच तिने वयाच्या १५व्या वर्षी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. झनकने पुरातत्वशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अभ्यास करताना कोणताही ताण घ्यायचा नव्हता, म्हणून तिने अभिनय सोडला होता. दरम्यान, झनक सोशल मीडियावरही सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.