Kashmera Shah apologizes to Sunita Ahuja: सिनेसृष्टीतील कलाकार विविध कारणांमुळे चर्चांचा भाग बनतात. काही वेळा त्यांचे व्यावासायिक आयुष्य या चर्चांचे कारण असते, तर काही वेळा खासगी आयुष्यामुळे ते चर्चेत येतात.
काही दिवसांपूर्वी गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, भाचा कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा शाह हे अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हिडीओमध्ये कृष्णा म्हणालेला की आजचा दिवस खूप चांगला आहे. तसेच, सुनीता आहुजा म्हणालेल्या की १४ वर्षांचा वनवास संपला. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यांच्यासाठी आनंदी असल्याचे म्हटले होते. त्यांच्यातील वादामुळे अनेक वर्षे सुनीता आहुजा यांचा भाचा कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा अभिषेक यांच्याबरोबर अबोला होता. लाफ्टर शेफच्या शूटिंगच्या निमित्ताने त्यांचे रियुनियन झाल्याचे पाहायला मिळाले.
आता लाफ्टर शेफचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की स्पर्धक त्यांचे काम करत असतात. त्यावेळी सुनीता आहुजांची शोमध्ये एन्ट्री होते. ये कृष्णा अशी ती हाक मारतात. सुनीता आहुजांना पाहून कृष्णाला आनंद होतो. तो त्यांना मीठी मारतो. सुनीता आहुजादेखील त्याला प्रेमाने मीठी मारतात.
कश्मीरा शाहने मागितली सुनीता आहुजांची माफी
इतर स्पर्धक टाळ्या वाजवतात. कृष्णा व सुनीता आहुजा दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळते. कृष्णा भावुक होत १४ वर्षे झाली, असेही म्हणतो. तो सुनीता आहुजांच्या पाया पडतो. तो म्हणतो, “मला तुमच्या पायाशी पार्किंग मिळाली. सुनीता मामी आज दोन गाड्यांसाठी पार्किंग हवी आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी कश्मीरा शाहदेखील दिसते. कश्मीरा त्यानंतर सुनीता आहुजांची माफी मागते. मला माफ करा असे म्हणते.
https://www.instagram.com/reel/DXgqGyqDdwU/?utm_source=ig_web_button_share_sheet
नेटकरी म्हणाले…
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “नाती महत्त्वाची असतात”, दुसऱ्याने लिहिले, “ती माफी का मागत आहे”, आणखी एकाने लिहिले, “१४ वर्षांचा वनवास संपला.” एकाने लिहिले, “गोविंदा सर कधी येणार? मला त्यांना या शोमध्ये बघायचं आहे.” एकाने लिहिले, “मी सुद्धा भावुक झालो आहे”, एकाने लिहिले, “याला समजूतदारपणा म्हणतात”, आणखी एकाने लिहिले, “कुटुंब हे कुटुंब असतं” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




सुनीता आहुजा त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांची अनेक वक्तव्ये सतत लक्ष वेधून घेतात. कृष्णा अभिषेक व कश्मीरा शाह सध्या लाफ्टर शेफच्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत.
