‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकतात. एक कोटी रुपयांची रक्कमही काही स्पर्धक मिळवतात. हा शो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. काही स्पर्धक आपली काही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शोमध्ये सहभागी होतात. असाच एक स्पर्धक ‘केबीसी’च्या नव्या भागामध्ये सहभागी झाला होता. शोमध्ये सहभागी होण्याचा उद्देशही त्याने यावेळी सांगितला.

विभू खंडेलवाल असं या स्पर्धकाचं नाव आहे. १९ वर्षाचा हा स्पर्धक कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. आपल्याला फक्त ३ लाख २० हजार रुपये जिंकायचे आहेत असं विभूने या शोमध्ये सांगितलं. कारण त्याला महाविद्यालयाची फी भरायची आहे. ही फी जवळपास ३ लाख रुपये आहे. तसेच विभूच्या आईनेही या शोमध्ये हजेरी लावली होती.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

विभूच्या आईने सांगितलं काही काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. शिवाय मीही गृहिणी आहे. त्यामुळे घर खर्च चालवायचा कसा हा प्रश्न असतो. अमिताभ हे ऐकून भावुक होतात. विभू या शोमध्ये ३ लाख रुपये जिंकण्यासाठी आला होता. पण आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्याने ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. पण १२ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नावर चुकीचं उत्तर दिल्याने तो या शोमधून बाहेर पडला.

आणखी वाचा – Video : लेकाने दिलेलं ‘ते’ वचन, घट्ट मिठी मारली अन्…; अमिताभ बच्चन मंचावरच रडू लागले, भावुक व्हिडीओ एकदा पाहाच

१२ लाख ५० हजार रुपयांसाठी त्याला १९८९मध्ये आपल्या सुर्यमालेतील कोणत्या ग्रहावर पृथ्वीच्या आकाराचा असलेला ग्रेट डार्क स्पॉट शोधण्यात आला होता? असा प्रश्न विचारण्यात आला. यासाठी शनी, युरेनस, नेपच्युन, बृहस्पती असे पर्याय देण्यात आले. याचं बृहस्पति असं विभूने उत्तर दिलं. मात्र त्याचं हे उत्तर चुकीचं होतं. नेपच्युन असं याचं बरोबर उत्तर आहे.