scorecardresearch

Premium

‘या’ अभिनेत्याचे मोठे फॅन आहेत अमिताभ बच्चन; खुलासा करत म्हणाले, “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”

अमिताभ यांनी यावेळी आवडत्या अभिनेत्याचा एक किस्साही सांगितला आहे.

amitabh-bachchan
अमिताभ बच्चन

बॉलीवूड सुपस्टार अमिताभ बच्चन सतत चर्चेत असतात. अमिताभ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यामातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात. सध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या भागाचे सूत्रसंचालन करत आहे. यावेळी एका स्पर्धेकाशी चर्चा करत असताना अमिताभ यांनी त्यांना आवडणाऱ्य़ा अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- वीणा जगतापने अभिनय क्षेत्राला केला रामराम? चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाली, “मी प्रोफेशनल मेकअपचा कोर्स केला कारण…”

darrs tu hai meri kiran song sounds ver wrong
“‘तू है मेरी किरण’ गाण्याचा अर्थ अतिशय चुकीचा”, ‘जवान’ फेम अभिनेत्याने मांडलं मत, म्हणाला, “मुलीला जबरदस्ती किस…”
actress amruta khanvilkar replied to netizen question
“मराठी बोलायला लाज वाटते का?”, अमृता खानविलकरच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
Bigg boss marathi fame sonali patil nana patekar
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”
prajaktaraj
हर्षदा खानविलकरांनी घातले प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तराज’ ब्रँडचे दागिने, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “हे दागिने खूप…”

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर पिंकी नावाची स्पर्धेक बसली होती. पिंकीला १२ लाख ५० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता की, दिलीप कुमार हे नाव धारण करण्यापूर्वी खालीलपैकी कोणते नाव युसुफ खान यांना दिले होते? पण पिंकिला या प्रश्नाचं उत्तर आलं नसल्यामुळे ती खेळ अर्धवट सोडते आणि ६ लाख ४० हजार रुपये घेऊन घरी जाते.

अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचं उत्तर देत एक किस्सा सांगितला आहे. बच्चन म्हणाले, दिलीप कुमार यांना एका चित्रपटात घेण्यात आले होते. पण बॉलीवूडमध्ये त्यांना त्यांच नाव बदलण्याचा सल्ला मिळाला होता. देविका राणी आणि भगवती चरण वर्मा यांनी त्यांना तीन नावं सूचवली होती. वासुदेव, दिलीप कुमार और जहांगीर. मात्र, त्यांनी दिलीप कुमार नावाची निवड केली. कालांतराने जेव्हा त्यांनी मुघले आझम चित्रपट केला तेव्हा त्यांनी साकारलेल्या पात्राचे नाव जहांगीर होते.

हेही वाचा-“माझे सासरे हयात असते तर…”; अभिनेता सुव्रत जोशीचं दिवंगत अभिनेते मोहन गोखलेंबाबतचं विधान चर्चेत

अमिताभ म्हणाले, “मी दिलीप कुमार यांचा सगळ्यात मोठा चाहता आहे. जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो दिलीप कुमार यांच्याअगोदर आणि दिलीप कुमार यांच्यानंतर असा लिहला जाईल. ते एक अनोखे कलाकार होते.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kaun banega crorepati 15 amitabh bachchan revealed he is biggest fan of dilip kumar dpj

First published on: 27-09-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×