कितीही वेगवेगळी माध्यमं आली, पर्याय उपलब्ध झाले तरी आज आपल्याकडे मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. मालिका म्हटलं की सासू-सुनेची भांडणं आणि फॅमिली ड्रामा यांभोवती फिरणारी कथानकं सर्रास पाहायला मिळतात. ओटीटीवर विविध विषयांवरील कॉन्टेन्ट उपलब्ध झाला असला तरीही मालिकेचे निर्माते – दिग्दर्शक तीच तीच कथा दाखवतात म्हणून अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. आता यावर अभिनेत्री कविता मेढेकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

कविता लाड – मेढेकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर मोठ्या कालावधीनंतर सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी प्रेक्षकांच्या मालिकेच्या कथानकाच्या आवडीबद्दल भाष्य केलं आहे. वेगळं कथानक आणलं तर प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…

आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

त्या म्हणाल्या, “मालिकेच्या आशयाबाबत प्रेक्षकांना अजिबात गृहीत धरता कामा नये. पण जर एखादी वेगळ्या विषयाची मालिका सुरू झाली तर प्रेक्षकांकडूनही त्याला म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि टीआरपीच्या कारणामुळे ती मालिका बंद करावी लागते. टेलिव्हिजन इंडस्ट्री ही व्यावसायिक गणितावर चालते आणि त्यामुळे टीआरपी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सासू-सुनेची भांडणं, छळ, बंडखोर कथानक दाखवण्यापेक्षा मालिकांच्या आशयाबाबत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न होत असल्याचं सध्या दिसून येत आहे.”

हेही वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

पुढे त्या म्हणाल्या, ” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत आम्ही चांगली पात्रं उभी करण्याचा प्रयत्न करत टोकाचं काही तरी दाखवणं टाळतो. या बदलला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर त्यांची आवड बदलत आहे हे दिसतं. तर अशा कथानकाला प्रतिसाद मिळाला नाही तर प्रेक्षकांना ‘किचन पॉलिटिक्स’मध्येच रमायला आवडतं, असं समजायला हरकत नाही.”