Premium

“वेगळ्या आशयांच्या मालिकांना प्रेक्षक…,” कविता मेढेकरांनी मालिकांच्या कथानकाबद्दल मांडलं स्पष्ट मत

मालिकेचे निर्माते – दिग्दर्शक तीच तीच कथा दाखवतात म्हणून अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. आता यावर अभिनेत्री कविता मेढेकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

kavita medhekar

कितीही वेगवेगळी माध्यमं आली, पर्याय उपलब्ध झाले तरी आज आपल्याकडे मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. मालिका म्हटलं की सासू-सुनेची भांडणं आणि फॅमिली ड्रामा यांभोवती फिरणारी कथानकं सर्रास पाहायला मिळतात. ओटीटीवर विविध विषयांवरील कॉन्टेन्ट उपलब्ध झाला असला तरीही मालिकेचे निर्माते – दिग्दर्शक तीच तीच कथा दाखवतात म्हणून अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. आता यावर अभिनेत्री कविता मेढेकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कविता लाड – मेढेकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर मोठ्या कालावधीनंतर सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी प्रेक्षकांच्या मालिकेच्या कथानकाच्या आवडीबद्दल भाष्य केलं आहे. वेगळं कथानक आणलं तर प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

त्या म्हणाल्या, “मालिकेच्या आशयाबाबत प्रेक्षकांना अजिबात गृहीत धरता कामा नये. पण जर एखादी वेगळ्या विषयाची मालिका सुरू झाली तर प्रेक्षकांकडूनही त्याला म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि टीआरपीच्या कारणामुळे ती मालिका बंद करावी लागते. टेलिव्हिजन इंडस्ट्री ही व्यावसायिक गणितावर चालते आणि त्यामुळे टीआरपी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सासू-सुनेची भांडणं, छळ, बंडखोर कथानक दाखवण्यापेक्षा मालिकांच्या आशयाबाबत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न होत असल्याचं सध्या दिसून येत आहे.”

हेही वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

पुढे त्या म्हणाल्या, ” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत आम्ही चांगली पात्रं उभी करण्याचा प्रयत्न करत टोकाचं काही तरी दाखवणं टाळतो. या बदलला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर त्यांची आवड बदलत आहे हे दिसतं. तर अशा कथानकाला प्रतिसाद मिळाला नाही तर प्रेक्षकांना ‘किचन पॉलिटिक्स’मध्येच रमायला आवडतं, असं समजायला हरकत नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kavita medhekar expressed her opinions about dailysoap content rnv