Khushboo Tawde Diet Routine and Fitness : खुशबू तावडे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. खुशबू तिची लेक राधीच्या जन्मापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सध्या अभिनेत्री तिच्या राघव व राधी या दोन्ही मुलांचं संगोपन करण्यात व्यग्र आहे. परंतु, यादरम्यान ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत शेअर करत असते.

खुशबू तावडे सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीने कामातून जरी सध्या ब्रेक घेतला असला तरी ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर व्लॉग पोस्ट करत असते. यामार्फत ती वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच आता तिने तिच्या डाएट रूटीनबद्दल सांगितलं आहे. खुशबू सध्या तिच्या आरोग्याकडेही लक्ष देत असल्याचं ती तिच्या चॅनेलवरील व्हिडीओमधून सांगत असते. खुशबूचं डेली रूटिन कसं असतं याबद्दल जाणून घेऊयात…

नाश्त्याला काय खाते खुशबू तावडे?

खुशबूने शेअर केलेल्या व्हिडीओमधून तिने ती सकाळची सुरुवात कशी करते, काय खाते तिचा आहार नेमका कसा असतो या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. खुशबूने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती सकाळी गुळाचा चहा पिताना आणि नाचणीचा आणि खजुराचा लाडू खाताना दिसते. यावेळी तिने तिला गुळाचा चहा खूप आवडतो आणि त्याबरोबर नाचणीचा आणि खजुराचा लाडू हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

‘अशी’ करते दिवसाची सुरूवात

नाश्त्यापूर्वी खुशबू सकाळी उठल्यानंतर पाणी पीऊन अक्रोड, भिजवलेले बदाम, काळे मनुके असं खाऊन सुरु करते. खुशबूने तिने अलीकडेच हे खायला सुरू केल्याचं म्हटलं आहे.  खुशबू यानंतर नाश्त्याला गुळाच्या चहाबरोबर कांदे पोहे, अंडी या गोष्टीसुद्धा खात असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. याचसह ती दुपारच्या जेवणासाठी भाज्या, नाचनीची भाकरी, भात असे पदार्थ खात असल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. या व्हिडीओमध्ये ती कोबीची भाजी, भिंडीची भाजी, नाचणीची भाजी आणि वरण असे पदार्थ बनवताना दिसतेय. 

योग्य आहारासह खुशबू तिच्या त्वचेची आणि केसांचीसुद्धा विशेष काळजी घेत असल्याचं तिच्या या व्हिडीओमधून दिसत आहे. सकाळी ती केस धुण्यापूर्वी दोन तास आधी केसांना तेल लावते आणि चेहऱ्यावर अॅलोव्हेराचं जेल लावते. दोन्ही मुलांची काळजी घेण्यात तिचा पूर्ण वेळ जात असला तरी ती स्वत:साठी या गोष्टी करत काळजी घेत असल्याचंही तिने म्हटलं आहे.