Devmanus Fame Marathi Actor Kiran Gaikwad Post : सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) घराघरांत लोकप्रिय झाला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत त्याने साकारलेली हर्षवर्धन या खलनायकाची भूमिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. आता किरण आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत किरणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील मुलाची कान्स फिल्म फेस्टिवलपर्यंत मजल; रोहित कोकाटे प्रवासाबद्दल म्हणाला, “जन्म झाल्यापासून…”

“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण, तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळतल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर” अशी पोस्ट शेअर करत किरण गायकवाडने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

किरणने ( Kiran Gaikwad ) या पोस्टवर “#SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings” असे हॅशटॅग दिले आहेत. अभिनेत्याची होणारी बायको सुद्धा अभिनेत्रीच आहे. किरण आणि वैष्णवी कल्याणकर यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ या मालिकेत काम केलं होतं. सध्या ती ‘तिकळी’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. किरणने शेअर केलेल्या फोटोंवर वैष्णवी कल्याणकरने “अहो…” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : नवज्योत बांदिवडेकरला ‘या’ मराठी सिनेमासाठी ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

हेही वाचा : अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला फोटो आला समोर; त्याचं नाव काय? हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Kiran Gaikwad
अभिनेता किरण गायकवाडची पोस्ट ( Devmanus Fame Marathi Actor Kiran Gaikwad Post )

दरम्यान, नेटकऱ्यांसह ( Kiran Gaikwad ) मराठी कलाविश्वातील कलाकारांनी या फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. धनश्री काडगांवकर, पृथ्वीक प्रताप, श्वेता रंजन, उत्कर्ष शिंदे, हेमंत ढोमे, पूर्वा शिंदे, माधुरी पवार, शरयू सोनावणे, शुभंकर एकबोटे या कलाकारांनी किरणला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader