आज महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला होता. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

“मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…”

Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Mulank Nine People Personality considered extremely fearless and rich according to numerology
Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात धाडसी आणि निर्भयी! मंगळाच्या कृपेने या क्षेत्रात कमावतात नाव
Ambedkar-Jayanti-Messages
Ambedkar Jayanti 2022 Wishes & Messages: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा पाठवून साजरी करा यंदाची भीम जयंती
चवदार तळ्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

किरण माने यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलंय. “…चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही…आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तर तुम्ही-आम्ही काय मेलो नव्हतो. त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून, इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी !”
…चवदार तळे, महाड !,
असं किरण माने यांनी लिहिलं आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेअर करताना लिहिलेलं कॅप्शन हे बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आहेत. “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे,” असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना म्हणाले होते.