Ankita Walawalkar Romantic Post For Husband : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आलेली ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच सर्वांची लाडकी अंकिता वालावलकर काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. यावर्षी १६ फेब्रुवारीला कोकणात अंकिता व कुणाल यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता सहभागी झाली होती. शोमध्ये असतानाच तिने लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने कुणालबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आज लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत ‘कोकण हार्टेड गर्ल’ने भावना व्यक्त केल्या आहेत.

अंकिताची कुणालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

प्रिय कुणाल,
आज तुझा वाढदिवस…आपण दोघेही सेलिब्रेशनच्या बाबतीत तसे अरसिक आहोत पण, आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या दिवशी एका घरात एक ‘मुन्ना’ जन्माला आला आणि त्याने २ महिन्यांपूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली. अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण, ती का वागते ते तू शोधलंस…तुझ्या असण्याने मला कामाची अजून ऊर्जा मिळत राहते…का जगावं यापेक्षा आयुष्य किती ‘येक नंबर’ आहे हे तू दाखवलंस… तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागचं वर्ष किती भारी जगलो याचं Celebration असलं पाहिजे. मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारी मी या वाढदिवसाला तुझी बायको आहे… अजून भारी काय असू शकतं!

मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो… मी हे म्हणेन की, स्वामी मला एवढी ताकद देवोत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. तुला जन्मदिवसाच्या ‘झापुक झुपूक’ शुभेच्छा!
खूप काम कर, खूप मोठा हो…
मी काय स्टुडिओत चटई टाकून झोपेन…

No late night work this year
Happy Birthday डार्लिंग नवऱ्या!

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कुणाल भगतवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धनंजय पोवारने सुद्धा “जावयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशी पोस्ट शेअर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे.