लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता गोविंदा व त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपले आहेत. कृष्णाने मामाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. जवळपास सात वर्षांनी या दोघांची भेट झाली. या महिन्याच्या सुरुवातीला गोविंदाला त्याच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी पायाला लागली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्याची रुग्णालयात भेट घेतली होती. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक त्यावेळी कामानिमित्त ऑस्ट्रेलियात होता. मात्र त्याची पत्नी कश्मीरा शाह गोविंदाला भेटायला रुग्णालयात गेली होती.

भारतात परतल्यावर कृष्णाने मामाची भेट घेतली. भेटीबद्दल त्याने स्वतःच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

abhijeet kelkar stuck in the traffic on ghodbunder road
“ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

ऑस्ट्रेलियात होता कृष्णा

कृष्णा अभिषेक नुकताच मामा गोविंदाला त्याच्या घरी भेटायला गेला. मामाची प्रकृती आता चांगली आहे, असं त्याने सांगितलं. “मी ऑस्ट्रेलियात असताना मला मामाबरोबर घडलेल्या घटनेबद्दल समजलं. मी माझा ऑस्ट्रेलिया दौरा जवळपास रद्द केला होता, मात्र रुग्णालयातील कर्मचारी आणि कश्मीरा यांच्याशी बोलल्यानंतर ते बरे होत असल्याचं कळलं”, असं कृष्णा म्हणाला.

हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

…अन् मामाला मारली मिठी

कृष्णा पुढे म्हणाला, “मी भारतात परत आल्यावर सात वर्षांनी पहिल्यांदा मामांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. असं वाटतंय जणू अर्धा वनवास पूर्ण केलाय. ते बरे होत आहेत. मी त्यांच्याबरोबर एक तास घालवला आणि सात वर्षांनी नम्मो (गोविंदाची मुलगी टीना आहुजा) हिला भेटलो. तो खूप भावनिक क्षण होता. मी फक्त त्यांना मिठी मारली. या भेटीत भुतकाळात घडलेल्या कोणत्याच गोष्टीचा उल्लेख नव्हता याचा मला आनंद आहे.”

कृष्णा पुढे म्हणाला, “आम्ही गप्पा मारल्या, हसलो आणि जुन्या दिवसांची आठवण झाली. सगळं आधीसारखंच वाटत होता. मी मामा-मामींच्या घरी घालवलेले ते वर्ष मला आठवले. आता आमच्यातील सर्व मतभेद दूर झाले आहेत.”

हेही वाचा – “मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

मामीला भेटू शकला नाही कृष्णा

“मला आनंद आहे की या भेटीत भूतकाळ घडलेल्या गोष्टींचा उल्लेख झाला नाही. कुटुंबे अशीच असतात, गैरसमज होतात मात्र कोणतीच गोष्ट आपल्याला फार काळ एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही. मी मामीला भेटू शकलो नाही कारण त्या व्यग्र होत्या, पण खरं सांगायचं झाल्यास मला मामींना भेटण्याची भीती वाटत होती कारण मला वाटलं होतं की त्या नक्कीच रागावतील. पण तुमच्या अज्ञानामुळे काही चूक झाली असेल तर वडीलधारे लोक बोलतील ते ऐकण्याची तयारी ठेवावी,” असं कृष्णाने नमूद केलं.

हेही वाचा Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

वाद मिटण्यास इतकी वर्षे का लागली?

आता मामाच्या घरी जात राहणार असल्याचं कृष्णाने सांगितलं. वाद मिटायला इतकी वर्षे का लागली असं विचारल्यावर तो म्हणाला, “एवढा वेळ का लागला हे मला माहीत नाही. बऱ्याच गोष्टी घडत होत्या, त्यामुळे भेट झाली नाही. मात्र, शेवटी आम्ही मतभेद विसरून पुढे गेलो याचा मला आनंद आहे. मामा आता बरे होत आहेत आणि घरातच फिरू शकत आहेत. आता मी जात राहीन आणि मामीलाही भेटेन.”

हेही वाचा : “वस्तू मिळतात अन्…”, अक्षयाने साड्यांच्या दुकानात लावली हटके ‘पुणेरी पाटी’! पाठकबाईंनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

नेमकं काय घडलं होतं?

गेली सात वर्षे कृष्णा अभिषेक व त्याचा मामा गोविंदा यांच्यात वाद सुरू होते. कृष्णा व बहीण आरती सिंह या दोघांनीही कठीण काळात आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना मामा गोविंदाने आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दर महिन्याला त्यांच्याकडून फक्त दोन हजार रुपये मिळायचे, असं म्हटलं होतं. त्यावरून गोविंदा व त्याची पत्नी सुनिताने नाराजी व्यक्त केली होती. घरातील गोष्टी जाहिरपणे बोलण्याची गरज नसल्याचं गोविंदा व सुनिता यांचं म्हणणं होतं. नंतर सुनिता आहुजा व कश्मीरा शाह यांनीही एकमेकांवर टीका केली होती आणि वाद वाढला होता.

Story img Loader