Sana Sayyad Announces Pregnancy : एकापाठोपाठ एक टीव्ही अभिनेत्री गुड न्यूज देत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्जीने ती आई होणार असल्याची बातमी दिली. त्यानंतर ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्याने लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्ट करून दिली. त्यानंतर आता ‘कुंडली भाग्य’मधील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री सना सय्यद लग्नानंतर तीन वर्षांनी आई होणार आहे. तिने बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.
सना सय्यदने नुकतेच तिचे पतीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिचा व तिचा पती इमाद दोघेही पोज देताना दिसत आहेत. फोटोमध्ये सना जीन्स व शर्ट घालून दिसत आहे. सनाने बेबी बंप फ्लाँट करत पोज दिल्या आहेत. फोटोंमध्ये इमाद व सना बेबी बंपबरोबर रोमँटिक पोज देत आहे. त्यांचे हे फोटो पाहून चाहते दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
सनाने तीन वर्षांपूर्वी केलं लग्न
सना सय्यदने गरोदर असल्याने मे २०२४ मध्ये ‘कुंडली भाग्य’ ही मालिका सोडली. नंतर सनाची जागा अद्रिजा रॉयने घेतली. सना व तिचा पती इमाद यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्न केलं. दोघे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. सनाने ‘कुंडली भाग्य’, ‘कुमकुम भाग्य’, ‘दिव्या दृष्टी’, ‘स्प्लिट्सविला’ आणि स्पाय बहू सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…
श्रद्धा आर्याने नुकतीच दिली गुड न्यूज
‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्याने रविवारी (१५ सप्टेंबर) इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करून गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली. अभिनेत्री श्रद्धा आर्या व राहुल नागल यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. श्रद्धा अभिनयक्षेत्रात काम करत आहेत, तर तिचा पती राहुल नौदल अधिकारी आहे. ३७ वर्षांची श्रद्धा लवकरच आई होणार आहे. श्रद्धापाठोपाठ आता सना सय्यदनेही गुड न्यूज दिली आहे.