अभिनेत्री श्रेया बुगडे व कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांची मैत्रीदेखील चाहत्यांना आवडत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या कार्यक्रमातून या कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या कार्यक्रमाने निरोप घेतला असला तरी यातील कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आता अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर अभिनेत्री श्रेया बुगडेबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेली कॅप्शन सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्रेया बुगडेबरोबरचा व्हिडीओ शेअर करीत कुशल बद्रिके म्हणाला…

अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया व कुशल आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होत असलेले दिसत आहेत. दोघेही कलाकार सुंदर पोशाखात तयार झालेले व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने संक्रांतीनिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये झी मराठी वाहिनीवरील सर्व मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी केले होते. त्यांच्या विनोदी स्टाइलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी कलाकारांनी वेगवेगळे खेळ खेळल्याचे पाहायला मिळाले होते. कुशल बद्रिकेने शेअर केलेला हा व्हिडीओ हा या कार्यक्रमादरम्यानचा असलेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “आनंदाची बातमी आताच दिली असती, पण एवढ्यात नको. आतापुरतं एवढच सांगेन, यह तो बस शुरवात है, आगे पूरी बारात है”, अशी कॅप्शन देत कुशलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

how to check car tyre conditions tips to know tyre air pressure car tips
‘या’ गोष्टींकडे करू नका अजिबात दुर्लक्ष! नाहीतर चालत्या गाडीचा फुटेल टायर…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”

दरम्यान, संक्रांतीनिमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनोरंजनाचे कोर्ट पाहायला मिळाले. या कोर्टात कुशल बद्रिके सगळ्या सासवांच्या बाजूने तर श्रेया बुगडे सगळ्या सुनांच्या बाजूने वकिलाच्या भूमिकेत दिसले होते. या कार्यक्रमातून त्यांनी धमाल केल्याचे पाहायला मिळाले होते.

Story img Loader